‘घर तेथे वृक्ष’ लागवड मनेगावी संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:11+5:302021-07-10T04:11:11+5:30
रामकृष्णहरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पाटोळे, मनेगाव ग्रामपंचायत, जय श्रीराम पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृत्तपत्र वितरक सुरेश कपिले यांच्या संकल्पनेतून ...
रामकृष्णहरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पाटोळे, मनेगाव ग्रामपंचायत, जय श्रीराम पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृत्तपत्र वितरक सुरेश कपिले यांच्या संकल्पनेतून मातोश्री अंजनाबाई कपिले यांच्या वाढदिवसानिमित्त गावात वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य शोभा भालेराव या उपक्रमात वैयक्तिकरीत्या विविध २१ प्रकारच्या झाडांची लागवड करणार आहेत, तसेच वृक्षांची स्थानिक नागरिक स्वयंस्फूर्तीने जोपासना करणार आहेत.
यावेळी उपसरपंच सी.डी. भोजणे, योगेश शिंदे, ह.भ.प. किरण महाराज पगारे, संदीप जेडगुले, भानुदास सोनवणे, भाऊसाहेब रौडे, मधुकर घोडेकर, विठ्ठल आंबेकर, वैभव गायकवाड, नारायण सोनवणे आदी उपस्थित होते.
चौकट-
बांधावरही झाडे लावण्याचा संकल्प
सरपंच शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष पंडितराव सोनवणे, रामकृष्णहरी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शोभेची, तसेच वड, पिंपळ, आंबा आदी वृक्ष शेतात, बांधावर लावणार असल्याचा संकल्प करीत वृक्षलागवडीस सुरुवात केली.
फोटो - ०९ मनेगाव १
मनेगाव येथे वृक्षलागवडीचा शुभारंभ करताना, सरपंच संगिता शिंदे, अंजनाबाई कपिले, उपसरपंच सी.डी. भोजणे, राजाराम मुरकुटे आदी.
090721\09nsk_7_09072021_13.jpg
मनेगाव येथे वृक्षलागवडीचा शुभारंभ करताना सरपंच संगिता शिंदे, अंजनाबाई कपिले, उपसरपंच सी. डी. भोजणे, राजाराम मुरकुटे आदी.