मनोरुग्णाच्या पोटातून काढली तब्बल ७२ नाणी! सवय बेतली जीवावर : पालघर जिल्ह्यातील रुग्णावर नाशिकमध्ये शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 01:17 AM2017-12-02T01:17:02+5:302017-12-02T01:18:10+5:30
‘बेझॉर’ वा ‘पायका’ या नावाने ओळखल्या जाणाºया मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी शुक्रवारी (दि़ १) एण्डोस्कोपीद्वारे एक, दोन नव्हे तर तब्बल ७२ चलनी नाणी बाहेर काढली़
नाशिक : ‘बेझॉर’ वा ‘पायका’ या नावाने ओळखल्या जाणाºया मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी शुक्रवारी (दि़ १) एण्डोस्कोपीद्वारे एक, दोन नव्हे तर तब्बल ७२ चलनी नाणी बाहेर काढली़ कॅनडा कॉर्नरवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये ही एण्डोस्कोपी करण्यात आली़ या आजाराने ग्रस्त रुग्णास खडू, केस वा माती यासारख्या वस्तू खाण्याचा मोह होतो; मात्र या रुग्णास चक्क लोखंड अर्थात चलनातील नाणी गिळण्याचीच सवय जडली होती़ डॉ़ अमित केले यांनी सुमारे साडेतीन तास शस्त्रक्रिया करून या रुग्णाच्या पोटातून एक, दोन, पाच व दहा रुपयांची ही ७२ नाणी बाहेर काढून रुग्णाला जीवदान दिले़
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील थोरातपाडा या आदिवासी पाड्यावर बेझॉर वा पायका मानसिक आजार झालेला पन्नासवर्षीय कृष्णा सोमल्या सांबर हा पत्नी व पाच मुलांसह राहतो़ मद्याची सवय असलेला व त्यातच मानसिक आजार असलेल्या कृष्णाला गत वीस वर्षांपासून लोखंडी वस्तू त्यातही पैसे गिळण्याची सवय जडली होती़ पोटातील नाण्यांचे मूल्य १६३ रुपये मानसिक आजार झालेल्या कृष्णा सांबर यांनी गिळलेल्या नाण्यांचे मूल्य १६३ रुपये आहे़ गिळलेल्या नाण्यांमध्ये दहा रुपयांची दोन, पाच रुपयांची १७, दोन रुपयांची २१, एक रुपयाची १४ व ५० पैशांची चार अशा नाण्यांचा समावेश आहे़ याबरोबरच पाच लोखंडी वायसर व एक नटही पोटातील जठरातून बाहेर काढण्यात आला आहे़ तरुणपणी गिळलेली काही नाणी गुदद्वारामार्फत बाहेर पडली, तर काही पोटातील जठराच्या आतील भागात अडकून पडली़ गत तीन वर्षांपासून सतत उलट्या व खाल्लेले अन्न पचत नसल्याने त्याने कल्याण तसेच काही खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी केली, मात्र निदान झाले नाही़ पाणी व ज्यूस यावर गत तीन वर्षांपासून जगत असलेल्या कृष्णाची प्रकृती अत्यंत खराब झाल्याने त्याच्या कुटुंबीयांच्या ओळखीतून त्यास कॅनडा कॉर्नरवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले़ तेथील सर्जन व एण्डोस्कोपीतज्ज्ञ डॉ़ अमित केले यांनी प्रथम कृष्णाच्या पोटाचा एक्सरे काढला. त्यामध्ये जठराच्या आतील भागात केवळ एक धातूचा तुकडा असल्याचे दिसत होते़ त्यामुळे डॉक्टर केले यांनी एण्डोस्कोपीचा निर्णय घेतला. मात्र जठरामध्ये अन्न असल्याने प्रथम ते साफ करण्यात आले़ यानंतर एण्डोस्कोपीमध्ये कृष्णाच्या जठरामध्ये चलनातील नाणी असल्याचे दिसले़