इंदिरानगर परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र ओरबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 04:33 PM2018-04-19T16:33:16+5:302018-04-19T16:33:16+5:30
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन गजानन महाराज मंदिरासमोरून उज्ज्वला वेंकटेश व्यास (५१ रा.औरंगाबाद ) या पायी जात असतांना बुधवार (दि१७)रात्रीच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी सुमारे ५४ हजार रुपये किंमतीची २७ ग्रॅम वजनाची सोनसाखळी गळ्यातून ओरबाडून पळ काढल्याचे फिर्यादीत व्यास यांनी म्हटले आहे
नाशिक : येथील गजानन महाराज मंदिराजवळून पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. या घटनेने पुन्हा एकदा सोनसाखळी चोरी करणारे चोरटे सक्रीय झाल्याचे बोलले जात आहे. परिसरात मोबाईल हिसकावून पळ काढणा-या दुचाकीचोरट्यांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे.
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन गजानन महाराज मंदिरासमोरून उज्ज्वला वेंकटेश व्यास (५१ रा.औरंगाबाद ) या पायी जात असतांना बुधवार (दि१७)रात्रीच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी सुमारे ५४ हजार रुपये किंमतीची २७ ग्रॅम वजनाची सोनसाखळी गळ्यातून ओरबाडून पळ काढल्याचे फिर्यादीत व्यास यांनी म्हटले आहे. व्यास या शहरात पाहुण्या आल्या असून त्यांची बहीण साधना गजानन चिक्षे (रा.गितांजली कॉलनी), यांच्या मुलाचा विवाह असल्याने त्या कुटुंबियांसमवेत आल्या. रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास व्यास या बहीणीसोबत चप्पल खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडल्या. यावेळी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी व्यास यांच्या गळ्यामधील सोनसाखळी बळजबरीने हिसकावून पळ काढला. यावेळी चोरटे हे जॉगींग ट्रॅकपासून अंतर्गत कॉलनी रस्त्याने चार्वाक चौकाकडे जात होते. दरम्यान, त्यांनी व्यास यांच्या समोरील दिशेने येऊ न गळ्यावर थाप मारत सोनसाखळी हिसकावल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेसंदर्भात इंदिरानगर पोलिसांनी संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.