मनमाड येथे मंगळसुत्र चोरट्यांना कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 06:16 PM2018-10-27T18:16:00+5:302018-10-27T18:16:35+5:30

महिलेचे मंगळसुत्र चोरून पळणाऱ्या चोरट्यांविरोधात मनमाड न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात न्यायालयाने दोन चोरांना प्रत्येकी दोन वर्षाचा कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

 Mangalasutra thieves imprisoned at Manmad | मनमाड येथे मंगळसुत्र चोरट्यांना कारावास

मनमाड येथे मंगळसुत्र चोरट्यांना कारावास

Next

मनमाड : महिलेचे मंगळसुत्र चोरून पळणाऱ्या चोरट्यांविरोधात मनमाड न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात न्यायालयाने दोन चोरांना प्रत्येकी दोन वर्षाचा कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
२०१० साली येथील रिना जितेंद्र जाधव व त्यांची नणंद जयश्री या भाजी घेण्यासाठी बाजारात जात असताना बंडू सुकदेव जमधाडे व लखन जनार्दन सोमासे रा: बल्हेगाव ता: येवला यांनी मोटारसायकलवर येउन महिलेच्या गळयातील सोन्याची पोत हिसकाउन पळ काढला. तेथील नागरिकांनी पाठलाग करून या चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
रिना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. स.पो.नि. दिलीप ठोंबळ न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायाधिश एन. एन. धेंड यांच्यासमोर खटल्याचे कामकाज चालले. साक्षी पुरावे तपासून न्यायालयाने आरोपिंना शिक्षा सुनावली आहे.
सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. नानासाहेब तांबे यांनी काम पाहिले तर कोट पैरवी अधिकारी म्हणून प्रविण वणवे यांनी मदत केली.

Web Title:  Mangalasutra thieves imprisoned at Manmad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.