भाविकांच्या मांदियाळीत फुलले मांगीतुंगी सिद्धक्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 11:50 PM2022-06-25T23:50:15+5:302022-06-25T23:50:42+5:30
सटाणा : देशभरातून आलेल्या भाविकांच्या मांदियाळीत शनिवारी (दि. २५) मांगीतुंगी सिद्धक्षेत्र फुलून गेले. पहाटेपासून भाविकांची सहकुटुंब, सहपरिवार ऋषभदेवपुरम येथे रीघ लागली होती. सकाळपासून पवित्र वातावरणात व उत्साहात ऋषभगिरी येथे भगवान ऋषभदेवांच्या १०८ फुटी उंच अखंड पाषाण मूर्तीवर पंचामृत महामस्तकाभिषेक झाला.
सटाणा : देशभरातून आलेल्या भाविकांच्या मांदियाळीत शनिवारी (दि. २५) मांगीतुंगी सिद्धक्षेत्र फुलून गेले. पहाटेपासून भाविकांची सहकुटुंब, सहपरिवार ऋषभदेवपुरम येथे रीघ लागली होती. सकाळपासून पवित्र वातावरणात व उत्साहात ऋषभगिरी येथे भगवान ऋषभदेवांच्या १०८ फुटी उंच अखंड पाषाण मूर्तीवर पंचामृत महामस्तकाभिषेक झाला.
पंचामृत कलशाचा मान काल (दि. २५) पुण्याच्या सुजाता शहा व परिवाराने मिळवला. अभिषेकापूर्वी त्यांनी पुणे जैन संघटनेतर्फे पीठाधीश, कर्मयोगी रवींद्रकीर्ती स्वामींजीचा पुणेरी पगडी व चलनी नोटांचा हार घालून हृद्य सत्कार केला. यावेळी महोत्सव समिती पदाधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. प्रथम कलशाचा मान कोलकात्याचे अजित पांड्या व त्यांच्या परिवारातील सदस्यांना देण्यात आल्याने त्यांनी धन्य झाल्याची भावना व्यक्त केली.
महामस्तकाभिषेकाच्या प्रारंभी संकल्प, प्रार्थना यांचे पौरोहित्य हस्तिनापूरचे प्रधान आचार्य विजय जैन, सांगलीचे दीपक पंडित व सत्येंद्र जैन यांनी केले. पवित्र जलाभिषेक, दुग्धाभिषेक, पंचामृताभिषेक करून भाविकांनी पुण्यप्राप्ती केली. महाशांतीधारा कलशाचा मान राजस्थानातील भाविकांनी मिळवला. सर्वांना पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामींजींनी आशीर्वाद प्रदान केले. महामंत्री संजय पापडीवाल, प्रमोद कासलीवाल व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्वांचा सन्मान करण्यात आला.
सोहळ्याच्या अकराव्या दिवशी शनिवारी गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी व प्रज्ञाश्रमणी आर्यिका श्री चंदनामती माताजी यांचे स्मरण करून श्रीफल अर्पण करण्यात आले. स्वामीजी रवींद्रकीर्ती महाराजांनी प्रास्ताविकात शुभाशीर्वाद दिले.
हामंत्री संजय पापडीवाल, अधिष्ठाता सी. आर. पाटील, खजिनदार प्रमोद कासलीवाल अशोक दोशी, कमल कासलीवाल, संजय दिवाण, हसमुख व मिहीर गांधी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मंगलाचरणाने प्रारंभ होऊन स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. जीवनप्रकाश जैन यांनी केले.
(२५ मांगीतुंगी)