आंबे दिंडोरी-मोहाडी रस्त्याची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 10:12 PM2020-10-24T22:12:34+5:302020-10-25T01:00:38+5:30
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील आंबेदिंडोरी ते मोहाडि रस्ता दूरुस्ती च्या प्रतिक्षेत.सदर रस्त्यावर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.आंबेदिंडोरी ते मोहाडी रस्त्याचा अक्षरशः रस्त्याचा फज्जा उडाला आहे. ठिक-ठिकाणी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. सदर रस्त्यावर वाहन चालवितांना चालकाचा तोल जावून अपघात होत आहे.

दिंंडोरी पंचायत समितीच्या संबंधीत दळणवळण विभागाने तात्काळ दिलेल्या निवेदनाची दखल घेवून या रस्त्याची दूरुस्ती करावी, अशी मागणी रिपाइंचे युवा तालुकाध्यक्ष सागर गायकवाड व शेतकरी सुभाष वाघ, संदिप कड, गणेश कुंभार, सौरभ गायकवाड, गणेश गांगुर्डे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
हा रस्ता दहा ते बारा वर्षापासून नादुरुस्त आहे. या रस्त्यावर एवढ्या वर्षात कधी डागडुजी करण्यात आली नाही. या रस्त्याकडे दिंडोरी पंचायत समितीच्या दळणवळन विभागाने कायमच कानाडोळा केला आहे. सदर रस्ता हा खेडगाव,बोपेगाव,जऊळके-वणी, मातेरेवाडी,लोखंडेवाडी,जोपुळ,खडक-सुकेना,कुर्नोली, कोराटे,मोहाडी अशा अनेक गावांना नाशिक येथील मुख्य बाजारपेठेला भाजीपाला घेऊन जाण्याचा जवळचा मार्ग आहे. सदरचा रस्ता हा सोयीस्कर असल्याने वर्दळ मोठ्या प्रमाणात राहाते प्रवाशांना नाशिकला जाण्याचा जवळचा मार्ग आहे. हा रस्ता अरुंद असल्याने रस्त्याच्या दुतर्फा चालकांना झाडा-झुडपांंच्या आड असलेल्या वाहाचा अंदाज येत नाहीत्यामुळे छोटे-मोठे अपघात होतात. त्यामुळे संबंधीत विभागाने तात्काळ रस्त्याची दूरुस्ती करावी, अन्यथा पंचक्रोशीतील शेतकरी व सर्व पक्षीयांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.