आंबा बहरला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 06:00 PM2019-03-04T18:00:38+5:302019-03-04T18:01:12+5:30
खेडलेझुंगे : यावर्षी निसर्गामध्ये झालेल्या बदलांना शेतकरी वर्ग सामोरे जात आहे. प्रत्येक वेळेस पिक चांगले येते तर भाव मिळत नाही आण िभाव असला तर शेतीमाल विक्र ीस नसतो. त्यामुळे शेतकरी पुरता हवालिदल झालेला आहे. अवकाळी पाऊस, बेसुमार थंडी, आता फेब्रुवारी मिहन्यात कमालीचे तापमान यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत मेटाकुटीला आलेला आहे. कांद्याला भाव नाही. वातावरणातील बदलामुळे द्राक्षही कवडीमोलाने विक्र ी होत आहे. त्यात परदेशी व्यापारी माल घेवुन पैसे न देताच पलायन करतात. त्यामुळे चोहीकडुन शेतकरी नुकसान ग्रस्त आहे.

आंब्याला आलेला मोहर अचानक बदलत्या हवामानामुळे खडतो की काय या भीतीमध्ये शेतकरी राजा सापडला आहे. यावर्षी गावठी आंबा आण िलागवड केलेल्या हापूस आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर आल्याने तालुक्यातील आंबा पिकांवर उदरिनर्वाह करणार्या शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावर्षी सर्वत्र आंब्याला मोठ्या प्रमाणावर मोहर आल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे परिसरातुन मोठ्याप्रमाणावर गावठी आंब्याचे उत्पादन होईल असे दिसुन येत आहे. निसर्गाने साथ दिली तर सर्वत्र आंब्याचे यावर्षी मोठ्याप्रमाणावर उत्पादन होवुन त्याचा फायदा होईल किवा कसे याबाबत शाशंका आहे. जर निसर्गाने ओव दिली तर यावर्षी आब्याचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन होईल यात शंका नाही.
बर्याच शेतकर्यांनी बांधावर, प्रांगणात, फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणात विविध जातीच्या आंब्याची लागवड केलेली आहे. या आंब्यांनाही मोठ्या प्रमाणात मोहर लागल्याने यावर्षी आंब्याचे चांगले पीक येईल, तालुक्यात गावठी आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने या आंब्यावर उदरिनर्वाह करणारे अनेक शेतकरी आहेत.
परिसरातील पाटाच्या बाजुने आयुष्याचे शतक पार केलेल्या आंब्यानाही मोठ्या प्रमाणात मोहर दिसू येत आहे. दोन दिवसांपासुन ढगाळ वातावरण झाल्याने आंब्यांना आलेला मोहोर खडून जातो की काय या भीती निर्माण झालेला आहे. (फोटो ०४ आंबा)