आंब्याला अद्याप मोहर फुटला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 09:04 PM2019-02-06T21:04:30+5:302019-02-06T21:05:16+5:30

खेडलेझुंगे : अत्यल्प पाऊस, अप्रतिकूल हवामान, तीव्र दुष्काळ, गेल्या पंधरवड्यात पडलेले दाट धुके यामुळे अद्याप आंब्याला मोहर फुटलेला नाही. जानेवारी महिन्याचा शेटचा आठवडा सुरू झालेला असुनही मोहर न फुटल्याने शेतकरी चिंतेत आहेत. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मोहर फुटण्यास सुरु वात होते. आता जानेवारी संपला तरीही जुन्या गावरान झाडांना मोहर नाही. त्यामुळे मोहर येण्याची आशा धुसर होत चालली आहे. यावर्षीच्या वातावरणातील बदलाचा सर्वच पिकांवर परिणाम झाल्याचे दिसुन येत आहे.

Mango has not yet broken the seal | आंब्याला अद्याप मोहर फुटला नाही

आंब्याला अद्याप मोहर फुटला नाही

googlenewsNext
ठळक मुद्देदुष्काळी स्थिती : प्रतिकुल हवामानामुळे शेतकरी चिंतेत अत्यल्प पाऊस

खेडलेझुंगे : अत्यल्प पाऊस, अप्रतिकूल हवामान, तीव्र दुष्काळ, गेल्या पंधरवड्यात पडलेले दाट धुके यामुळे अद्याप आंब्याला मोहर फुटलेला नाही. जानेवारी महिन्याचा शेटचा आठवडा सुरू झालेला असुनही मोहर न फुटल्याने शेतकरी चिंतेत आहेत. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मोहर फुटण्यास सुरु वात होते. आता जानेवारी संपला तरीही जुन्या गावरान झाडांना मोहर नाही. त्यामुळे मोहर येण्याची आशा धुसर होत चालली आहे. यावर्षीच्या वातावरणातील बदलाचा सर्वच पिकांवर परिणाम झाल्याचे दिसुन येत आहे.
उशिरा आलेल्या थंडीमुळे व धुक्यामुळे आंब्याची अनेक झाडे मोहरली नाहीत. काही झाडांना थोडाफार आलेला मोहर अतिथंडीमुळे करपून जात आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
पूर्वी ग्रामीण भागात गावाच्या आजूबाजूला आमराई असायची त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आंब्याची किंमत वाटायची नाही. परंतु कालांतराने वृक्षतोड माफियाकडून या फळांच्या झाडाची कत्तल झाली त्यामुळे ही आमराई नामशेष झाली आहे. त्यामुळे गावागावात मिळणारे आंब्याचे उत्पादन घटले आहे. आता काही शेतकऱ्यांकडे थोडी फार आंब्याची झाडे आहेत. त्या झाडांना अजुनही मोहर फुटलेला दिसत नाही. ज्या झाडांना मोहोर आलेला आहे तोही अतिथंडीमुळे व जोराच्या वाºयामुळे गळुन पडत आहे. त्यामुळे गेल्या वर्षी सारखीच पुनरावृत्ती होवू नये अशी आस बाळगून शेतकरी आहेत.
गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात झाडांना मोहर दिसत होता परिणामीे उत्पन्न चांगले मिळेल अशी शेतकºयांना आशा वाटत होती. मात्र वातावरणातील परिणामामुळे गतवर्षी मोहर गळून गेला होता. त्यामुळे शेतकºयांच्या पदरी निराशा पडली होती. गेल्या पंधरवड्यात पडलेल्या दाट धुक्यामुळे आंब्याच्या मोहराला फटका बसला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या धुक्याच्या कहरामुळे, अतिथंडीमुळे सुद्धा आंब्याला याचा फटका बसतो व ढगाळ वातावरणामुळे आलेला तुरळक मोहर गाळून जात आहे.

Web Title: Mango has not yet broken the seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती