‘आंबा थिअरी’च्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:36 AM2018-06-13T01:36:05+5:302018-06-13T01:36:05+5:30

अपत्यप्राप्तीसाठी आपल्या शेतातील आंबे उपयुक्त असल्याचा दावा करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आरोग्य सेवा संचालकांनी महापालिकेस दिले आहेत.

 'Mango Theory' inquiry order | ‘आंबा थिअरी’च्या चौकशीचे आदेश

‘आंबा थिअरी’च्या चौकशीचे आदेश

Next

नाशिक : अपत्यप्राप्तीसाठी आपल्या शेतातील आंबे उपयुक्त असल्याचा दावा करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आरोग्य सेवा संचालकांनी महापालिकेस दिले आहेत.  गेल्या रविवारी (दि. १०) नाशिक शहरातील वडांगळीकर मठ येथे झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडे  यांनी माझ्या शेतातील १८० पेक्षा जास्त आंबे दीडशे जणांना खायला दिले, त्यांना मुलेच झाली, तसेच ज्यांना मुलगा हवा  असेल त्यांना मुलगाच होईल असे विधान केले होते. त्याचे तीव्र पडसाददेखील उमटले असून, गणेश बोºहाडे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीचा संदर्भ घेऊन पुणे येथील अतिरिक्त आरोग्य संचालकांनी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाºयांना आदेश दिले आहेत. मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्या विधानाची खातरजमा करावी आणि त्यांच्यावर कार्यवाही करून तत्काळ अहवाल पाठवावा, असे नमूद करण्यात आले आहे.

Web Title:  'Mango Theory' inquiry order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.