वकिलवाडीत आंब्याचे झाड कोसळले; पाच दुचाकींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 04:47 PM2021-02-01T16:47:42+5:302021-02-01T16:47:54+5:30

झाडांचा अडथळा कोणाकडून दुर केला जात आहे? असा सवाल काही वृक्षप्रेमींनी व्यक्त केला आहे. आंब्याचे झाड हे पोकळ झाडांच्या प्रजातींमधील नसून वादळवारा नसताना अशा पध्दतीने झाड कोसळण्याची घडलेली घटना संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.

Mango tree fell in Vakilwadi | वकिलवाडीत आंब्याचे झाड कोसळले; पाच दुचाकींचे नुकसान

वकिलवाडीत आंब्याचे झाड कोसळले; पाच दुचाकींचे नुकसान

Next
ठळक मुद्देअग्नीशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली

नाशिक : शहरातील अत्यंत गजबजलेल्या वकीलवाडी परिसरातील एका व्यापारी संकुलाच्या वाहनतळात असलेले आंब्याचे मोठे झाड सोमवारी (दि.१) दुपारच्या सुमारास कोसळले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणही व्यक्ती जखमी झाली नाही; मात्र वाहनतळात उभ्या असलेल्या दुचाकींचा चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले.

वकिलवाडीमध्ये असलेल्या सारडा संकुल या व्यापारी संकुलाच्या वाहनतळात असलेले आंब्याचे मोठे झाड दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास अचानकपणे उन्मळून पडले. यावेळी संकुलाच्या वाहनतळात उभ्या असलेल्या दुचाकी झाडांच्या फांद्यांखाली दाबल्या गेल्या. झाडाच्या काही फांद्या वर्दळीच्या रस्त्यावरही येऊन पडल्यामुळे वाहतुकही विस्कळीत झाली होती. नागरिकांनी तत्काळ अग्नीशमन दलाशी संपर्क साधून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. कोसळलेल्या वृक्षाच्या फांद्यांचा अडथळा पेट्रोलकटरच्या सहाय्याने जवानांनी कापून दूर केला. या दुर्घटनेत ॲक्सेस, ॲक्टीवा, अव्हेंजर यासांरख्या दुचाकींचे नुकसान झाले. दरम्यान, वादळवारा नसताना हिरवागार असलेला डेरेदार आम्रवृक्ष अचानकपणे कसा कोसळला? याविषयी परिसरात चर्चा रंगली होती. झाडांचा अडथळा कोणाकडून दुर केला जात आहे? असा सवाल काही वृक्षप्रेमींनी व्यक्त केला आहे. आंब्याचे झाड हे पोकळ झाडांच्या प्रजातींमधील नसून वादळवारा नसताना अशा पध्दतीने झाड कोसळण्याची घडलेली घटना संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. मनपाच्या उद्यान विभागाने याबाबत पाहणी करुन पंचनामा करण्याची मागणी होत आहे.
-----

 

Web Title: Mango tree fell in Vakilwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.