मांडुळाची तस्करी करणाऱ्याला कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 01:08 AM2018-08-12T01:08:35+5:302018-08-12T01:08:55+5:30
मालेगाव : शहरातील मोतीबाग नाका परिसरात मांडुळाची तस्करी करणाºया अभिजित विठ्ठल जाधव (२८) या तरुणाला पोलिसांनी व वनविभागाने संयुक्त कारवाई करून ताब्यात घेतले आहे. जाधव याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवस १३ आॅगस्टपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

मोतीबाग नाका परिसरात अभिजित जाधव मांडुळाची तस्करी करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वनविभागाच्या व पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत जाधव याला ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे मांडूळ जातीचा साप आढळून आला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध वनविभागात वन्यप्राणी जीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दूनगहू, सुनील अहिरे, सुहास छत्रे, वसंत महाले, रतिलाल वाघ, सुनील पानसरे, राकेश उबाळे, फिरोज पठाण आदींनी ही कारवाई केली.