मांजरगाव निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 11:54 PM2017-10-03T23:54:30+5:302017-10-03T23:54:35+5:30
आदर्श : पंडित सोनवणे यांना थेट सरपंचपदाचा पहिला मान सायखेडा : गोदाकाठ भागातील महत्त्वपूर्ण समजली जाणारी मांजरगाव येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्याने आठ जागांसाठी २६ अर्ज, तर सरपंचपदासाठी सहा अर्ज आल्याने ही निवडणूक अटीतटीची होण्याचे संकेत असताना, दोन्ही पॅनलच्या सूत्रधारांनी समझोता करत ही निवडणूक बिनविरोध करून गावापुढे नवीन आदर्श निर्माण केला आहे.
आदर्श : पंडित सोनवणे यांना थेट सरपंचपदाचा पहिला मान
सायखेडा : गोदाकाठ भागातील महत्त्वपूर्ण समजली जाणारी मांजरगाव येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्याने आठ जागांसाठी २६ अर्ज, तर सरपंचपदासाठी सहा अर्ज आल्याने ही निवडणूक अटीतटीची होण्याचे संकेत असताना, दोन्ही पॅनलच्या सूत्रधारांनी समझोता करत ही निवडणूक बिनविरोध करून गावापुढे नवीन आदर्श निर्माण केला आहे.
थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक असल्याने सुनील सोनवणे आणि गणपत हाडपे या दोन्ही पॅनलच्या नेतृत्वांनी सरपंचपद काबीज करण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. सरपंचपदासाठी सुनील सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, सुभाष नागरे, अनिल हाडपे, पंडित सोनवणे, राधाकिसन हाडपे असे सहा अर्ज दाखल झाले होते. माघारीच्या दिवसापर्यंत दोन्ही पॅनलमध्ये अनेक घडामोडी घडल्या. त्यात माघारीच्या दिवशी खुद्द पॅनल नेतृत्व करीत असलेले सुनील सोनवणे यांनी सरपंचपदासाठी भरलेला अर्ज माघारी घेत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. पंडित सोनवणे, अनिल हाडपे या दोघांचे सरपंचपदासाठी अर्ज असताना अनिल हाडपे यांची समजूत काढत त्यांची माघार घेऊन पंडित सोनवणे बिनविरोध सरपंचपदी विराजमान झाले. महत्त्वाचे पदच बिनविरोध झाल्याने सदस्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
त्यात सुनिल सोनवणे,शोभा सोनवणे, मंदा दौड, नयना सोनवणे, सोमनाथ हाडपे,शाम पवार,संगिता गांगुर्डे,यांचा समावेश केला आहे. भास्कर सोनवणे, शंकर सोनवणे, पांडुरंग सोनवणे, बाळासाहेब सोनवणे(सर),व्ही.एन हाडपे, वंसत सोनवणे, शिवनाथ सोनवणे, रामनाथ सोनवणे, दगु नागरे, संजय सोनवणे, खंडु सानप, नवनाथ दौड, आरु ण सोनवणे, बबन सोनवणे, शिवाजी हाडपे, माणकि सोनवणे, विठोबा बोद्रे, शंकर गांगुर्डे, सुकदेव उगले, सोमनाथ सोनवणे, संदिप सानप, सोमनाथ उगले, फिकरा आंबेकर, प्रविण शिरसाठ, नामदेव गोधंडे, बबन बिडवे आदिनी नविनर्वाचिताचे अभिनंदन केले.