‘मामको’ बॅँकेत चोरीचा अयशस्वी प्रयत्न

By Admin | Published: February 2, 2016 10:21 PM2016-02-02T22:21:13+5:302016-02-02T22:21:41+5:30

मालेगाव : ‘स्ट्राँग’ रूममधील लाखो रुपये बचावले

'Manko' failed attempt to rob the bank | ‘मामको’ बॅँकेत चोरीचा अयशस्वी प्रयत्न

‘मामको’ बॅँकेत चोरीचा अयशस्वी प्रयत्न

googlenewsNext

मालेगाव : येथील कॅम्पातील भरवस्तीत असलेल्या मालेगाव मर्चण्ट्स को-आॅप. बँकेच्या शाखेत अज्ञात चोरट्याचा बँक लुटण्याचा प्रयत्न फसला असून, याबाबत कॅम्प पोलिसांत नोंद करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या व जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये झालेल्या चोऱ्यांच्या पाठोपाठ आता मामको बँकेकडेही चोरट्यांनी मोर्चा वळविल्याने घबराट पसरली आहे.
आणि कट फसला..
मालेगाव मर्चण्ट्स बँकेच्या कॅम्प शाखेला मंगळवारी सुटी असते. मामको बँकेने मंगळवारची सुटी बदलून ती आता रविवारी केली आहे. या निर्णयानंतर आज पहिल्या मंगळवारी बँक सुरू होती.
दरम्यान, सकाळी बँकेत सफाईसाठी कर्मचारी संतोष जोशी आले असतर कुलपाला चावी लावून कुलूप उघडत नसल्याने कुलपे बदलली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बँकेने कुलपे बदलली असावीत असे समजून सफाई कर्मचाऱ्याने बँकेचे व्यवस्थापक देशपांडे यांना फोन केला. बँकेची कुलपे बदलली असल्याचे त्यांना सांगितले. शाखा व्यवस्थापक देशपांडे यांनी याबाबत महाव्यवस्थापक बागडे यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यानंतर बँकेच्या संचालकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकच धावपळ झाली. शेजारीच मामको बँकेचे संचालक संजय दुसाने यांना हा प्रकार कळविण्यात आला. दुकाने यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ कॅम्प पोलिसांना माहिती दिली. कॅम्पचे पोलीस निरीक्षक भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक सकाळी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनेची पाहणी केली.
चोरट्याने बँकेची बदललेली कुलपे तोडून आत प्रवेश करण्यात आला. घटनेची पाहणी करण्यात आली. बँकेतून कोणताही ऐवज चोरीस गेलेला नसल्याचे पाहून बँक अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, काही दिवसांपासून कॅम्पसह शहरात घरफोड्यांचे सत्रात वाढ झाली असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: 'Manko' failed attempt to rob the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.