मनमाडला १३ रुग्ण ठणठणीत बरे होऊन परतले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:27 PM2020-06-11T22:27:42+5:302020-06-12T00:25:52+5:30

मनमाड : येथील सेंट झेवियर्स शाळेतील कोरोना उपचार केंद्रातील १३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना गुरुवारी (दि. ११) घरी सोडण्यात आले. कोरोनाशी लढा देणाऱ्या या रुग्णांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

At Manmad, 13 patients recovered and returned home | मनमाडला १३ रुग्ण ठणठणीत बरे होऊन परतले घरी

मनमाडला १३ रुग्ण ठणठणीत बरे होऊन परतले घरी

Next

मनमाड : येथील सेंट झेवियर्स शाळेतील कोरोना उपचार केंद्रातील १३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना गुरुवारी (दि. ११) घरी सोडण्यात आले. कोरोनाशी लढा देणाऱ्या या रुग्णांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
शहरातील चार कुटुंबात आढळलेल्या २२ रुग्णांमुळे प्रशासनाची धावपळ उडाली. या सर्व रु ग्णांवर सेंट झेवियर्स शाळेत उघडण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.या केंद्रातील १३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. यामध्ये ३ परु ष, ४ मुले व ६ महिलांचा समावेश आहे. मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, डॉ. जी.एस. नरवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन रुग्णांचे स्वागत केले. संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे तसेच सजग राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: At Manmad, 13 patients recovered and returned home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक