मनमाडला सतत खंडित वीजपुरवठ्यामुळे नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 10:16 PM2021-05-05T22:16:28+5:302021-05-06T01:14:50+5:30

मनमाड : शहरात सतत होणाऱ्या खंडीत विज पुरवण्यामुळे ग्रामस्थ तीव्र नाराजी झाले आहे. या संदर्भात बैठकघेवून चर्चा करण्यात आली. ...

Manmad annoyed by continuous power outage | मनमाडला सतत खंडित वीजपुरवठ्यामुळे नाराजी

मनमाड येथे वीज मंडळ अधिकाऱ्यांशी चर्चा करताना शिवसेनेचे राजाभाऊ भाबड, संतोष बळीद, अल्ताफ खान, मयुर बोरसे, प्रमोद पाचोरकर आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देजनतेची गैरसोय टाळण्यासाठी योग्य खबरदारीचे आश्वासन




मनमाड : शहरात सतत होणाऱ्या खंडीत विज पुरवण्यामुळे ग्रामस्थ तीव्र नाराजी झाले आहे. या संदर्भात बैठकघेवून चर्चा करण्यात आली.

या खंडीत होणाऱ्या विज पुरवण्यामुळे शिवसेनेच्या वतीने वीज मंडळाच्या गेल्या १० ते १५ दिवसांपासून सुरू असलेल्या गलथान कारभारा विरोधात आंदोलनाची भूमिका जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर कार्यकारी अभियंता तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा, शहरातील जुनाट झालेली वायरिंग, पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी कामे, वागददर्डी फिडरवर वाढलेल्या लोडमुळे वारंवार फेल होणे, नवीन सबस्टेशनच्या निर्मितीचे थांबलेले काम सुरू करणे, सध्या कोविड परिस्थिती गंभीर असल्यामुळे अचानक एखादे फिडर बंद पडल्यास काम पूर्ण होईपर्यंत वीज पुरवठा त्वरित सुरू करण्यासाठी पर्यायी व्यवस्था व इतर अनेक तक्रारी बाबत सखोलपणे चर्चा होऊन यावर करावयाच्या उपाय योजना संबधी आवश्यक ती पूर्तता करून जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

यावेळी मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, उपप्रमुख संतोष बळीद,जेष्ठ नेते अल्ताफ खान, शहरप्रमुख मयुर बोरसे, नगरसेवक प्रमोद पाचोरकर, तालुका संघटक सुभाष माळवतकर, शहर संघटक महेंद्र गरूड आदी उपस्थित होते.

Web Title: Manmad annoyed by continuous power outage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.