APMC Election: मनमाड बाजार समितीचा निकाल हाती; अपक्षाने खातं उघडलं, शिंदे गटाला १ जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 01:34 PM2023-05-01T13:34:06+5:302023-05-01T13:37:56+5:30
पहिल्या फेरीत हमाल मापारी गटात अपक्ष उमेदवार मधुकर उगले यांनी सोळा मतांनी विजय मिळवला असून त्यांना एकूण ७४ मते मिळाली आहे.
मनमाड (नाशिक) : राज्यात सध्या बाजार समित्यांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाजार समिती निवडणुकांत महाविकास आघाडीचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे, महायुतीनेही यंदा या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. आज मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीसाठी निकाल जाहीर होत असून मतमोजणीच्या पहिल्या फेरीत हमाल मापारी गटात अपक्ष उमेदवार मधुकर उगले यांनी सोळा मतांनी विजय मिळवला असून त्यांना एकूण ७४ मते मिळाली आहे.
व्यापारी गटात अपक्ष उमेदवार किसनलाल बंब आणि रुपेश ललवाणी यांचा विजय
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत व्यापारी गटातून अपक्ष व्यापारी विकास पॅनलचे किसनलाल बंब ६९ मतं मिळाली असून रुपेश कुमार ललवाणी हे ७६ मते मिळवून विजयी झाले. तर नवनिर्माण व्यापारी विकास पॅनलचे प्रकाश आव्हाड व रवींद्र आहेर यांचा पराभव झाला.
मनमाडला ग्रामपंचायत गटात महाविकास आघाडीला ३ जागा तर शिंदे गटाला १ जागा
मनमाड (नाशिक) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामपंचायत गटात महाविकास आघाडीला तीन जागा तर एक जागा आमदार कांदे गटाला मिळाली आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश कदम, सुभाष उगले, गंगाधर बिडगर विजय झाले असून शिंदे गटाकडून दशरथ लहरे विजय झाले आहेत