मनमाडला घरफोड्या करणारी टोळी जेरबंद

By admin | Published: December 10, 2015 10:38 PM2015-12-10T22:38:21+5:302015-12-10T22:39:21+5:30

मनमाडला घरफोड्या करणारी टोळी जेरबंद

Manmad gang-raped gangs | मनमाडला घरफोड्या करणारी टोळी जेरबंद

मनमाडला घरफोड्या करणारी टोळी जेरबंद

Next

मालेगाव : मनमाड शहरात घरफोड्या करणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून चार लाख २७ हजार ३०० रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येवला, मनमाड, मालेगाव परिसरात घरफोड्या वाढल्याने नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या पथकाने सापळा रचला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिलावट, अनिल ढुमसे, हवालदार राजेंद्र पाटील, रवींद्र वानखेडे, दीपक अहिरे, राजेंद्र लहारे, कैलास देशमुख आदि पोलिसांनी कारवाई करून आकाश अनिल अहिरे (२२) रा.शिवाजीनगर, दत्तमंदिराजवळ, मनमाड, अभिलाष दीपक बनकर (२०) रा. शिवाजीनगर, जयभवानी व्यायामशाळेजवळ मनमाड यांना अटक केली.
त्यांच्या बॅगमधून सोन्याचे दागिने, पोती, मंगळसूत्र, कर्णफुले, टॉप्स, मुरण्या असा १४० ग्रॅम ५०० मिली वजनाचे ३ लाख ६४ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि घरफोडीतील भ्रमणध्वनी संच व रोख रक्कम ५९ हजार अशी एकूण चार लाख २७ हजार ३०० रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक कडासने म्हणाले, नाशिक येथे बैठक घेऊन देवस्थानांच्या मालमत्तेविषयी घ्यावयाची काळजी, नेमायचे सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, शस्त्र आदिंबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: Manmad gang-raped gangs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.