मनमाडला शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:20 AM2018-04-26T01:20:13+5:302018-04-26T01:20:13+5:30

येथे विवेकानंदनगरमध्ये राहणारे मुख्याध्यापक मुकुंददास मनोहरदास शोभावंत यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. ते मेसनखेडे ता. चांदवड येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम पहात असत. आॅनलाइन कामाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी त्यांच्या खिशात पोलिसांना आढळून आली असल्याचे सांगण्यात आले.

Manmad gets a teacher's suicide | मनमाडला शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

मनमाडला शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

googlenewsNext

मनमाड : येथे विवेकानंदनगरमध्ये राहणारे मुख्याध्यापक मुकुंददास मनोहरदास शोभावंत यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. ते मेसनखेडे ता. चांदवड येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम पहात असत. आॅनलाइन कामाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी त्यांच्या खिशात पोलिसांना आढळून आली असल्याचे सांगण्यात आले.  शोभावंत यांची पत्नी व मुली बाहेरगावी लग्नाला गेले होते. बुधवारी त्यांची मुलगी घरी आली असता घराच्या छताला शोभावंत यांनी फाशी घेतल्याचे तिला आढळून आले. मुकुंददास मनोहरदास शोभावंत (५४) यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती राजेंद्र अनिलकुमार बैरागी यांनी पोलिसांना दूरध्वनीद्वारे दिली. शोभावंत हे त्यांचे मेहुणे होत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर.एस. निंबाळकर हे करीत आहेत.
सत्यता पडताळणार
पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली असता शोभावंत यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. आॅनलाइन कामाला व शाळेच्या बांधकामाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहिले असल्याचे समजते. या चिठ्ठीची सत्यता पोलीस पडताळून पहात आहेत.

Web Title: Manmad gets a teacher's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू