मनमाडला वाहतुकीची समस्या कायम

By Admin | Published: October 30, 2016 11:10 PM2016-10-30T23:10:04+5:302016-10-30T23:25:29+5:30

मनमाडला वाहतुकीची समस्या कायम

Manmad has a problem of transport | मनमाडला वाहतुकीची समस्या कायम

मनमाडला वाहतुकीची समस्या कायम

googlenewsNext

 मनमाड : शहरातील प्रभाग क्र्र्रमांक ७ मध्ये इदगाह, स्विपर कॉलनी, टकार मोहल्ला, इदगाह झोपडपट्टी, हुसेनी चौक, जामा मशीद परिसर, कोर्ट रोड, नूर चौक, राजवाडा, रोहीदासवाडा, कुंभारवाडा, शनिमंदिर, बालाजी मंदिर, मनोरम सदन भिंत, कॉलेज रोड पूल, गवळी स्मशानभूमी, पाकिजा पान टपरी, अरुण सोनवणे ज्वेलर्स, इदगाह पूल, गवळी मंगल कार्यालय आदि परिसर येतो.
प्रभाग क्रमांक ७ हा नागरिकांचा मागासवर्ग महिला व सर्वसाधारण गटाच्या उमेदवारासाठी राखीव आहे. या प्रभागाची लोकसंख्या ५५७७ असून, मतदार संख्या ३९६८ इतकी आहे. यामध्ये २०४२ पुरुष व १९२६ महिलांचा समावेश आहे. शहरातील मुख्य गावठाण परिसर तसेच पुणे-इंदूर महामार्गाच्या पश्चिम बाजूकडील काही भाग या प्रभागामध्ये येतो. नवीन प्रभागरचनेत पूर्वीच्या प्रभागातील काही भाग वगळण्यात आला आहे तर काही भाग नव्याने जोडण्यात आला आहे. या संबंधीत भागांसाठी सध्या राजेंद्र पगारे, मंगला हिरणवाळे, अमिन पटेल, संगीता मगर हे नगरसेवक आहेत. या प्रभागात मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक, गटारी, रस्ते आदी विकासकामे झाली आहेत. गावठाण भागातील अंतर्गत पाइपलाइन बदलण्याचे काम बहुतांशी झाले आहे. या प्रभागातील अरूंद रस्ते व बोळी यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असते. स्वच्छतेचा व आरोग्याचा प्रश्न इतर प्रभागाप्रमाणे या प्रभागातसुद्धा अनेकवेळा निर्माण होत असतो. (वार्ताहर)

Web Title: Manmad has a problem of transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.