मनमाडला विद्यार्थ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 11:43 PM2020-01-09T23:43:19+5:302020-01-09T23:44:04+5:30
पंचशील वाचनालयाचे सामाजिक प्रबोधनाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केले. यशोधरा विहारासमोर आयोजित विद्यार्थी गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
मनमाड : येथील पंचशील वाचनालयाचे सामाजिक प्रबोधनाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केले. यशोधरा विहारासमोर आयोजित विद्यार्थी गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष प्रवीण पगारे, तर प्रमुख अतिथी म्हणून व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, रेल सेनेचे राजाभाऊ भाबड, संतोष बाकलीवाल, शेरूभाई मोमीन, नगरसेवक गंगाभाऊ त्रिभुवन, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, रामदास पगारे, धम्मदीप म्हस्के आदी व्यासपीठावर उपस्थित होते. वक्तृत्व व निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
वाचानालयासाठी अभ्यासिका व पुस्तकांसाठी स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार कांदे यांनी दिले. कार्यक्रमाचे संयोजन प्रमुख कार्यवाह एस.एम. भाले, संदीप बेदाडे राकेश पगारे, सुजाता शिनगारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष आनंद शिनगारे यांनी केले.