मनमाड : शेतमाल विक्रीचे लाखोंचे धनादेश वटले नाहीत संतप्त शेतकऱ्यांचे साखळी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:10 AM2018-04-18T00:10:10+5:302018-04-18T00:10:10+5:30
मनमाड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकलेल्या शेतमालाचे पैसे व्यापारी वर्गाकडून मिळत नसल्याने संतप्त शेतकºयांनी माजी आमदार संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू केले.
मनमाड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकलेल्या शेतमालाचे पैसे व्यापारी वर्गाकडून मिळत नसल्याने संतप्त शेतकºयांनी माजी आमदार संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू केले. काही व्यापाºयांनी शेतकºयांना दिलेले लाखो रु पयांचे धनादेश न वटल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याविरोधात करण्यात आलेल्या उपोषणात असंख्य शेतकरी सहभागी झाले होते.
परप्रांतीय व्यापारी शेतकºयांना गंडा घालून शेतमालाचे पैसे बुडवत असल्याचे प्रकार नित्याचे असले तरी मनमाड येथील काही स्थानिक व्यापाºयांनी शेतकºयांना दिलेले ३२ लाख रुपयांचे चेक बाऊन्स झाले. व्यापाºयांनी पैसे देण्यास नकार दिल्याने शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक वर्षात कधी नव्हे ते कांद्याला चांगला भाव मिळाला असला तरी विकलेल्या मालाचे चेक बाऊन्स झाल्याने अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याबाबत बाजार समितीचे संचालक व माजी आमदार संजय पवार यांनी बाजार समिती प्रशासन तसेच जिल्हा निबंधक यांना वारंवार तक्र ारी केल्या. त्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने काही व्यापाºयांचे परवाने रद्द करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शेतकºयांचे पैसे तत्काळ मिळावे यासाठी पत्रव्यवहार करूनही दखल घेण्यात न आल्याने संतप्त शेतकºयांनी माजी आमदार पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (बाजार समिती कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले. उपोषणात जि. प. सदस्य आशाबाई जगताप, बाजार समिती संचालक अशोक पवार, राजू सांगळे, संजय अहेर, दीपक गोगड, मीराबाई गंधाक्षे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जयकुमार फुलवानी, राजेंद्र देशमुख, माजी जि. प. सदस्य राजाभाऊ पवार, अनंत अहेर, विठ्ठल अहेर यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.