मनमाड : कॅलेंडरमध्ये जयंतीच्या सुट्टीचा उल्लेख नसल्याने निषेध
By admin | Published: January 22, 2015 12:37 AM2015-01-22T00:37:00+5:302015-01-22T00:37:12+5:30
रेल्वे प्रशासनाला बाबासाहेबांचा ‘विसर’!
मनमाड : मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या २०१५वर्षाच्या कॅलेंडरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंतीच्या सुट्टीचा उल्लेख नसल्याने संतप्त झालेल्या रेल्वे इंजिनियरिंग कारखान्यातील एससी-एसटी असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी कॅलेंडरची होळी करून निषेध
व्यक्त केला. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी रोष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात
आली.
महात्मा गांधी जयंतीप्रमाणे डॉ. आंबेडकरांची जयंतीदिनी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. सदरचे चुकीचे कॅलेंडर रद्द करून नवीन कॅलेंडर छापण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युनियनचे अध्यक्ष सतीश केदारे, सिध्दार्थ जोगदंड, मनोज जोगदंड यांनी रेल्वे प्रशासनाला मनोगतातून दिला. यावेळी अशोक पगारे, नामदेव हिरे, अशोक गरुड, सुनील तगारे, हर्षद शिंदे, प्रभाकर निकम, सुनील सोनवणे, रवींद्र सोनवणे, विलास कराड, संदीप पगारे, किरण अहिरे, विकास अहिरे, कल्याण धिवर, मनोहर अहिरे, अनिल सुपेकर, सुभाष जगताप, फकिरा सोनवणे, जॉय देठे, संदीप धिवर, एम्प्लॉइज असोसिएशनचे सुरेश अहिरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.(वार्ताहर)