नियम मोडणाऱ्या दुकांदारावर मनमाडला दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 02:32 PM2020-07-25T14:32:19+5:302020-07-25T14:33:00+5:30

मनमाड : कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या नियमाचे उल्लंघन करणाºया दुकानदारांविरोधात पालिका प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेत ९५०० रु पयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Manmad punishes shopkeepers for breaking rules | नियम मोडणाऱ्या दुकांदारावर मनमाडला दंडात्मक कारवाई

मनमाड येथे दुकानावर कारवाई करताना प्रशासकिय अधिकारी राजेंद्र पाटील, जितेंद्र केदारे, अशोक पाईक, विलास कातकडे, नितीन पाटील, रामदास पगारे, किरण आहेर आदी.

Next
ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक तीव्र स्वरु पाची कारवाई करण्यात येईल

मनमाड : कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या नियमाचे उल्लंघन करणाºया दुकानदारांविरोधात पालिका प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेत ९५०० रु पयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पालिकेने शहरात सर्व दुकानदार, व्यापारी यांना सम विषम ही शासनाची नियमावली ठरवुन देऊन प्रत्येक दुकान दिवसाआड उघडले जाईल असा आदेश दिला आहे. यामुळे शहरातील नागरिकांच्या होणाºया गर्दीवर अंकुश ठेवता येणार आहे. सदरील नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई, दुकान सिल करणे व फौजदारी कारवाई करण्याची तरतुद असल्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाºया दोन दुकानदारांची दुकाने सील करून ९५०० रु पयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या वेळी प्रशासकिय अधिकारी राजेंद्र पाटील, करअधिक्षक जितेंद्र केदारे, करअधिक्षक अशोक पाईक, विलास कातकडे, नितीन पाटील, रामदास पगारे, किरण आहेर, राजेंद्र वैजापुरकर, मिलिंद पुरंदरे, अनिल आहिरे, संजय गवळी, कैलास पाटील आदी उपस्थित होते.
या नंतर ही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक तीव्र स्वरु पाची कारवाई करण्यात येईल असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
 

Web Title: Manmad punishes shopkeepers for breaking rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.