मनमाडला वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण
By admin | Published: May 8, 2017 01:21 AM2017-05-08T01:21:32+5:302017-05-08T01:21:50+5:30
मनमाड : रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी नकार दिल्याने संतप्त नातेवाइकांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप घोंगडे यांना मारहाण केल्याची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी नकार दिल्याने संतप्त नातेवाइकांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप नाथा घोंगडे व परिचारिका अहिरे यांना मारहाण केल्याची घटना घडली.
येथील मुमताज शेख या महिलेवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले; मात्र रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी नातेवाइकांनी आग्रह धरला होता. दाखल करून घेण्याची गरज नसल्याचे सांगितल्याने संतप्त नातेवाइकांनी डॉ. संदीप घोंगडे व परिचारिका अहेर यांना मारहाण केली. डॉ. घोंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुमताज शेख, बबलू मजहर सैयद व एक युवक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या निषेधार्थ वैद्यकीय अधिकारी संघटनेने बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. घटनेच्या निषेधार्थ सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका लाक्षणिक संप पुकारणार आहेत़ सोमवारी आपत्कालीन सेवा वगळता ओपीडी व इतर सेवा बंद राहणार असल्याची माहिती डॉ़ ए़ माहुलकर यांनी दिली़ तर रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी संप मागे घेण्याची विनंती केली जाणार आहे असे डॉ़ सुरेश जगदाळे यांनी सांगितले़