मनमाड-येवला-कोपरगाव रस्त्याची चाळणी
By Namdeo Kumbhar | Published: November 21, 2019 04:03 PM2019-11-21T16:03:33+5:302019-11-21T16:05:55+5:30
येवला: मनमाड-येवला-कोपरगाव रस्त्याची चाळणी झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याच रस्त्यावरून चांदवड व मालेगाव या मार्गावरून येणारी सगळी अवजड वाहनांची वाहतूक याच मार्गाने येवला व मनमाड शहरातून जाते.यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला:
मनमाड-येवला-कोपरगाव रस्त्याची चाळणी झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याच रस्त्यावरून चांदवड व मालेगाव या मार्गावरून येणारी सगळी अवजड वाहनांची वाहतूक याच मार्गाने येवला व मनमाड शहरातून जाते.यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी चांदवड व मालेगाव कडून येणारी अवजड वाहतूक नांदगाव मार्गे वळवावी अशी मागणी येवलेकरांनी केली आहे. डॉ.अरविंद अंतुर्लीकर उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
येवल्यातील सर्व शाळांचे प्रतिनिधी तसेच येथील आनंद शिंदे, बाळासाहेब मांजरे, समीर देशमुख, प्रीतम पटणी यांनी या संबंधाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की मालेगाव व चांदवड मार्गे येणाº्या अवजड वाहनांस मनमाड व येवला शहरांमधून नगर-शिर्डी मार्गे जाण्यास प्रतिबंध करावा. मालेगाव मनमाड मार्गे अहमदनगर ला जाणाº्या अवजड वाहनांस प्रतिबंध करावा. पांजर नदीवरील मनमाड शहरातील चांदवड चौफुलीजवळील सध्या सुरू असलेला आर.सी.सी चा पुल अरु ंद व कुमकुवत आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.
नगर - मनमाड राज्य महामार्ग हा येवला व मनमाड शहरातून गेलेला आहे.त्या महामार्गाला लागून दोन्ही बाजूस शाळा,कॉलेज असल्याने महामार्गावरील वरील वाहनांचा विद्यार्थ्यांना व शहरातील नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. मनमाड व येवला शहरातील नागरिक व तसेच विद्यार्थ्यांना प्रवास करणे धोकादायक ठरत आहे.व कित्येकदा अपघातही झाले आहेत.या रस्त्यावर धावणाº्या अवजड वाहनांमुळे अनेकांचे अपघातात जीव गेले आहे.
अशा वाहनांना मनमाड-नांदगाव मार्गे औरंगाबाद बाजूस वळविण्यात यावे.अशी मागणी केली आहे..
या अवजड वाहनांना मनमाड व येवला मार्गे येण्यास प्रतिबंध करून नांदगाव मार्गे वळवल्याने विद्यार्थ्यांचे व शहरातील नागरिकांचे होणारे अपघात टाळता येतील असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रति शहर वाहतूक कक्ष प्रमुख, शहर वाहतूक नियंत्रण कक्ष मनमाड व येवला, सार्वजनिक बांधकाम उपविभाग मनमाड व येवला तहसील कार्यालय येवला यांना देण्यात आल्या आहेत.