सीआरएमएस रेल्वे संघटनेतर्फे मनमाडला आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2022 01:51 AM2022-06-18T01:51:30+5:302022-06-18T01:51:53+5:30
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारसह प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे मनमाड रेल्वे कार्यशाळेत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कामगारांच्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
मनमाड : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारसह प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे मनमाड रेल्वे कार्यशाळेत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कामगारांच्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
जुनी पेन्शन बंद करावी, रेल्वे वर्कशॉपमध्ये नवीन वर्क ऑर्डर देण्यात याव्यात, वर्कशॉपमधील पिण्याचे पाणी, मशीनसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, वर्कशॉपचे शेड लिकेज बंद करावे, ग्रुप डीच्या जागा भराव्या, वर्कऑर्डरसाठी वेळेवर कच्च्या मालाची पूर्तता करावी आणि कामगारांच्या सुरक्षेबाबत विविध प्रश्न मांडण्यात आले. सचिव नितीन पवार, महेंद्र चौथमल, प्रकाश बोडके यांनी या आक्रोश आंदोलनप्रसंगी कामगारांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी चेअरमन प्रकाश बोडके, सेक्रेटरी नितीन पवार, वर्किंग चेअरमन महेंद्र चोथमल, हेडक्वॉर्टर कमिटी मेंबर एकनाथ पाटील, खजिनदार मुक्तार शेख, गौतम वाघ, हेमंत सांगळे, वैभव कापडे, अरुण कलवर, शुभम माळवतकर, प्रशांत ठोके, नागेंद्र शुक्ला, सुनील शिंदे, सोमनाथ सणस, बलराज तगारे, रमेश सिन्हा, स्वनील महाजन, योगेश महाजन, असिफ खान, अमोल साळवे, वाल्मीक बाविस्कर, अमोल खाडे, सचिन सांळुके, नंदू कदम, दीपक बोरसे, योगेश शेरेकर, इच्छाराम माळी, हेमंत माळी, राम आहेर, सागर हाडपे आदी सहभागी झाले होते.