मनमाडला बँका, महावितरण, टपाल कार्यालयाचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 11:26 PM2022-03-28T23:26:11+5:302022-03-28T23:26:41+5:30

मनमाड : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरण, खासगीकरण, कंत्राटीकरण आदी विविध धोरणांच्या विरोधात लक्ष वेधण्यासाठी आणि महागाईचा उसळलेला आगडोंब कमी करावा, या प्रमुख मागणीसह कामगारांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून देशव्यापी संप सुरू झाला आहे. या संपामुळे मनमाड शहरातील काही बँका, महावितरण आणि पोस्ट कार्यालयाचे कामकाज मोठ्या प्रमाणावर ठप्प होऊन नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

Manmadla Banks, MSEDCL, Post Office stalled | मनमाडला बँका, महावितरण, टपाल कार्यालयाचे कामकाज ठप्प

मनमाड शहरातील पोस्ट कार्यालयासमोर संपात सहभागी होऊन विविध घोषणाबाजी देताना कर्मचारी.

googlenewsNext
ठळक मुद्देसोमवारी पूर्ण दिवसभर पूर्णपणे बंद

मनमाड : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरण, खासगीकरण, कंत्राटीकरण आदी विविध धोरणांच्या विरोधात लक्ष वेधण्यासाठी आणि महागाईचा उसळलेला आगडोंब कमी करावा, या प्रमुख मागणीसह कामगारांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून देशव्यापी संप सुरू झाला आहे. या संपामुळे मनमाड शहरातील काही बँका, महावितरण आणि पोस्ट कार्यालयाचे कामकाज मोठ्या प्रमाणावर ठप्प होऊन नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

संपामुळे मनमाड शहर पोस्ट ऑफिसचे कामकाज सोमवारी पूर्ण दिवसभर पूर्णपणे बंद होते. त्यामुळे पोस्टात नियमित काम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. संपकरी कामगारांनी पोस्ट कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जोरदार घोषणा देत उग्र निदर्शने केली. बी. एस. खैरनार, एम. बी. भालके, डी. जी. सोनवणे, बी. एम. वाबळे, एस. पी. गायकवाड, बी. बी. सोनवणे, ए. एम. कुलकर्णी, हेमलता सोनवणे आदी कर्मचाऱ्यांनी घोषणा देत निदर्शने केली. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कर्मचारी या संपात उतरल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास काय करावे? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. महावितरणच्या येथील येथे रोडवरील कार्यालयाचे प्रवेशद्वार सोमवारी पूर्णपणे बंद होते. महावितरणचे कर्मचारीही या संपात सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे काही राष्ट्रीयीकृत बँकादेखील या संपात उतरल्या आहेत. मनमाड शहरातील महाराष्ट्र बँक आणि युनियन बँक या दोन्ही बँकांचे कामकाज संपामुळे दिवसभर ठप्प होते. राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज मात्र नियमित सुरू होते. स्टेट बँक, देना बँक आदी बँकांमध्ये नियमित व्यवहार सुरू होते.
 
Web Title: Manmadla Banks, MSEDCL, Post Office stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.