मनमाडला कोरोना लसीकरण गैरव्यवस्थेबाबत भाजप आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:14 AM2021-05-15T04:14:01+5:302021-05-15T04:14:01+5:30

मनमाड : शहरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आरोग्य प्रशासन करत असलेल्या बेजबाबदारपणा, हलगर्जीपणाबाबत मनमाड शहर भाजपने आक्रमक भूमिका ...

Manmadla BJP aggressive over corona vaccination malpractice | मनमाडला कोरोना लसीकरण गैरव्यवस्थेबाबत भाजप आक्रमक

मनमाडला कोरोना लसीकरण गैरव्यवस्थेबाबत भाजप आक्रमक

Next

मनमाड : शहरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आरोग्य प्रशासन करत असलेल्या बेजबाबदारपणा, हलगर्जीपणाबाबत मनमाड शहर भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे. भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, वाल्मीकी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजाभाऊ पवार, सचिन संघवी, सचिन लुणावत, एकनाथ बोडखे यांच्या नेतृत्वामध्ये मनमाड ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर बी. जे. गोरे यांना लसीकरण मोहिमेत सुधारणा करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

लसीकरण मोहिमेत आरोग्य प्रशासनाने बेजबाबदारपणे हलगर्जीपणा केल्याचा आरोप शहर भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. साडेचार महिन्यांत एक लाख पन्नास हजार लोकवस्तीच्या मनमाड शहरातील १० टक्के नागरिकांना लसीकरण करण्यात हे प्रशासन अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे परिस्थिती नियंत्रणात येत आहे. कोरोना संकटात प्रतिबंधात्मक लसीकरण हाच प्रभावी उपाय असताना मनमाड येथील लसीकरण मोहिमेबाबतीत आरोग्य प्रशासन अजिबात गंभीर नाही. लसीकरण मोहिमेबाबतच्या करण्यात आलेल्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात; अन्यथा आरोग्य प्रशासनाच्या या हलगर्जीपणाविरोधात शहर भाजप तीव्र व आक्रमक स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत माहितीसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ससाणे आणि मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे यांनाही देण्यात आली आहे.

----------------------

मनमाड भाजपच्यावतीने आरोग्य विभागास निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, राजाभाऊ पवार , सचिन संघवी , सचिन लुणावत, एकनाथ बोडके आदी. (१४ मनमाड)

===Photopath===

140521\14nsk_14_14052021_13.jpg

===Caption===

१४ मनमाड

Web Title: Manmadla BJP aggressive over corona vaccination malpractice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.