मनमाडला उद्यापासून तीन दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 09:59 PM2021-03-18T21:59:37+5:302021-03-19T01:16:01+5:30
मनमाड : शहरातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शनिवार दि.२० ते सोमवार दि.२२ मार्च असे तीन दिवस सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मनमाड : शहरातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शनिवार दि.२० ते सोमवार दि.२२ मार्च असे तीन दिवस सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनानुसार कोविड-१९ ची साखळी तोडण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या अध्यक्ष पद्मावती जगन्नाथ धात्रक, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.१८) बैठक घेण्यात आली.या
बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार शनिवार व रविवार हे दोन दिवस बंद वार असतील तर सोमवारी दि. २२ मार्च हा दिवस जनता कर्फ्यू म्हणून शहर बंद घोषित करणेबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या बंदच्या कालावधीमध्ये शहरातील फक्त औषधांची दुकाने नियमित सुरु असतील.
उपाय योजना म्हणून मनमाड नगर परिषदेमार्फत विविध पथकांची नियुक्ती केलेली आहे.
..तर कोरोना सेंटरमध्ये भरती
कोरोना विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांच्या हातावर शिक्के मारुन त्यांना होम आयसोलेट करण्यात येत आहे. अशा प्रकारचे बाधित झालेले रुग्ण शहरात इतरत्र फिरताना आढळल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करुन त्यांना कोरोना सेंटरमध्ये भरती करण्यात येणार आहे.