मनमाडला वरुणराजाच्या हजेरीत पोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:18 AM2021-09-08T04:18:36+5:302021-09-08T04:18:36+5:30
बैलांना आंघोळ घालून त्यांची सजावट करण्यात आली. सायंकाळी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. बैलांवर टाकलेली ...
बैलांना आंघोळ घालून त्यांची सजावट करण्यात आली. सायंकाळी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. बैलांवर टाकलेली सैराट, परशा, आर्ची, शिवराय आदी नावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. दरम्यान, बैलांची मिरवणूक सुरू असतानाच वरुणराजाने हजेरी लावल्याने बळीराजा आनंदित झाला. भालूर येथे गावातील वेशीत सरपंच अर्चना निकम यांनी पोळ्यासाठी आलेल्या बैलांचे औक्षण केले. त्यानंतर गावातून मारुती मंदिरासमोरून बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात बैलांची मिरवणूक काढली. यावेळी सरपंच अर्चना निकम, दिगंबर निकम, विक्रम निकम, अनिल बरशिले, नंदू ईल्हे, भागवत पवार, वालुराम पवार, वसंत निकम, जितेंद्र बरशिले, सौरभ निकम, शंकर मुळे, बाळकृष्ण आहेर, गोकुळ धनगे, नितीन बरशिले आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
भालूर येथे बैलांचे औक्षण करताना सरपंच अर्चना निकम समवेत दिगंबर निकम, विक्रम निकम, नंदू ईल्हे अनिल बरशिले आदी. (०७ मनमाड)
070921\07nsk_8_07092021_13.jpg
०७ मनमाड