मनमाडला गुरुपौर्णिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2016 12:42 AM2016-07-21T00:42:11+5:302016-07-21T00:48:23+5:30

मनमाडला गुरुपौर्णिमा

Manmad's gurupornima | मनमाडला गुरुपौर्णिमा

मनमाडला गुरुपौर्णिमा

Next


मनमाड : शहर व परिसरात मंगळवारी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील अनेक मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
येथून जवळच असलेल्या बोयेगाव येथील शिवटेकडीवर १४ वर्षे तपश्चर्येला बसलेल्या सोमेश्वरानंद महाराज यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त साधनागृहाबाहेर येऊन सूर्याला अर्ध्य दिले. यावेळी उपस्थित पंचक्रोशीतील भाविक व जनसमुदायाने त्यांना अभिवादन केले.
मालेगाव रस्त्यावरील चोंडी येथील बोयेगाव टेकडीवर गुरुपौर्णिमेनिमित्त झालेल्या सत्संग साहेळ्यास भाविकांनी पहाटेपासुन मोठी गर्दी केली होती. पायी टेकडीवर आलेल्या हजारो स्त्री-पुरुष भाविकांच्या उपस्थितीत या वर्षीचा गुुरुपौर्णिमा उत्सव साजरा झाला.
गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. हा उत्सव शहरात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. शहरातील शिवाजीनगर न.१ मधील श्रीसंत गजानन महाराज मंदिर, दत्तमंदिर, श्रीराम मंदिर, बालाजी विठ्ठल मंदिर, स्वामी समर्थ केंद्र कलावती आई परमार्थ निकेतन, वेशीतील विठ्ठल मंदिर, अनकवाडे शिवारातील श्रीसंत सदग्ुरू साईबाबा मंदिर, सुभाष रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिर, गजानन महाराज मंदिर आदि ठिकाणी गुरुपौणिमा उत्सव भक्तिभावाने साजरा झाला.
अनकवाडे शिवारात संत सद्गुरु साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. साईबाबांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात येऊन विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. माजी नगराध्यक्ष राजाभाऊ छाजेड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
गुरुपौणिमेनिमित्त शहरातील सर्वच मंदिरांत पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शिर्डी येथे उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या विविध पालख्या मनमाड शहरातून राज्य मार्गाने साईनामाचा गजर करत शिर्डीकडे मार्गस्थ झाल्या. शिर्डी येथे जाण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर बसस्थानकात गर्दी दिसून आली. (वार्ताहर)

Web Title: Manmad's gurupornima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.