मनमाडला ‘माणुसकीची भिंत’
By admin | Published: January 24, 2017 10:55 PM2017-01-24T22:55:49+5:302017-01-24T22:56:07+5:30
सामाजिक बांधिलकी : गरजूंना मिळणार फायदा
मनमाड : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहर शिवसेनेच्या वतीने अन्नदान, महाआरती,माणुसकीची भिंत आदी विविध उपकम्रांचे आयोजन करण्यात आले होते.शहराच्या विविध भागात शिवसेना शाखांच्या वतीने प्रतिमा पुजन करण्यात आले. शिवसेना शहर शाखा व संकलेच्या सर्व्हीसेस यांच्या संयुक्त विद्यमाने सुभाष चौक येथील बुरूड मारूती मंदिरा शेजारी माणुसकीची भिंत या आगळया वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांच्या हस्ते व मनमाड विभागाचे पोलीस उपअधिक्षक डॉ. राहूल खाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.वस्त्रदान हे सुध्दा मोठे दान असून गोरगरिबांना मदतिचा हात देण्यासाठी वस्त्रदान अर्थातच माणुसकीची भिंत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.आपल्याकडील जुने अडगळीतील न वापरातले कपडे, वस्तू, खेळणी या ठिकाणी ठेवण्यात आली असून गरजुंना याचा लाभ होणार आहे.या वेळी माजी आमदार राजाभाउ देशमुख, जगन्नाथ धात्रक, अलताफ खान, शहर प्रमुख मयुर बोरसे, नगरसेवक गणेश धात्रक, प्रमोद पाचोरकर, कैलास गवळी, दिलीप भाबड, लियाकत शेख, विनोद ठाकरे, विनय अहेर,सुनिल पाटील, सुधशकर मारे, दिलीप तेजवाणी, संदिप संकलेचा, चतुरसींग राजपुरोहीत आदी मान्यवर उपस्थित होते.