मनमाडला भीषण पाणीटंचाई, महिलांचा हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:35 PM2019-03-13T12:35:53+5:302019-03-13T12:37:50+5:30
मनमाड : शहरात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून येथील श्रावस्ती नगर भागात विस दिवस उलटून ही पाणीपुरवठा करण्यात न आल्याने संतप्त महिलांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढला.
मनमाड : शहरात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून येथील श्रावस्ती नगर भागात विस दिवस उलटून ही पाणीपुरवठा करण्यात न आल्याने संतप्त महिलांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढला. येथील श्रावस्ती नगर भागात पाण्याची पाईप लाईन टाकण्यात आलेली नाही त्यामुळे बोरवेलच्या पाण्यावर नागरिक तहान भागवत होते .परंतु यंदा शहर परिसरात दमदार पाऊस न झाल्यामुळे नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने या भागातील महिलांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढला होता.यावेळी महिलांनी पाणी पुरवठा अधिकारी शामकांत जाधव यांना निवेदन दिले असून त्यात श्रावस्ती नगर भागात पाईप लाईन टाकून सुरळीतपणे पाणी पुरवठा करण्याची मागणी केली.पाईप लाईन टाकण्यासाठी पालिका प्रशानाने निविदा काढली होती, ती मंजूर ही झालेली आहे. त्यामुळे लवकरच पाईप लाईन टाकण्याच्या कामाला सुरु वात होणार असल्याचे जाधव यांनी सांगून तो पर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले.