आमदाराकडूनच स्वकीयांना डावलण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:14 AM2021-02-14T04:14:18+5:302021-02-14T04:14:18+5:30

देवळाली मतदार संघात मोडणाऱ्या सुमारे दोन डझन गावांमध्ये स्थानिक आमदार निधीतून कोट्यवधी रूपयांचे विकासकामे केली जाणार असून, राष्ट्रवादीचे आमदार ...

The manner in which the MLAs themselves are ousted | आमदाराकडूनच स्वकीयांना डावलण्याचा प्रकार

आमदाराकडूनच स्वकीयांना डावलण्याचा प्रकार

Next

देवळाली मतदार संघात मोडणाऱ्या सुमारे दोन डझन गावांमध्ये स्थानिक आमदार निधीतून कोट्यवधी रूपयांचे विकासकामे केली जाणार असून, राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन ठेवण्यात आले होते. वर्षानुवर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या मतदार संघावर तीस वर्षानंतर राष्ट्रवादीने पहिल्यांदाच पक्षाचा झेंडा रोवला असताना व आता विकास कामांच्या बळावर पक्षाची पाळेमुळे खोलवर रूजविण्याची वेळ आलेली असताना पक्षाचे आमदार मात्र एकला चलोच्या भूमीकेत वावरू लागल्याने पक्ष कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. या विकास कामांचे मतदार संघातील अनेक पदाधिकाऱ्यांना साधे निमंत्रणही आमदारांकडून देण्यात आलेले नाही. शिवाय गेल्या दोन दिवसांपासून पक्षाचे ज्येष्ठ नेते व पालकमंत्री छगन भुजबळ हे नाशिक मुक्कामी असून, त्यांना मोठेपण देवून या विकासकामांचा शुभारंभ करणे सहज शक्य असताना त्यांनाही या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यापुर्वीही मतदार संघातील समस्या समजावून घेतांना आमदारांनी केलेल्या दौऱ्यात स्थानिक पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना डावलण्यात आले असून, ज्यांचा पक्षाशी संबंध नाही अशांना सोबत घेऊन जर आमदार वाटचाल करीत असतील तर त्याचा पक्षाला कसा फायदा होणार असा सवालही केला जात आहे.

Web Title: The manner in which the MLAs themselves are ousted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.