सुकेणेकर गादीच्या महंतपदी मनोहरशास्त्री
By admin | Published: April 6, 2017 01:19 AM2017-04-06T01:19:12+5:302017-04-06T01:19:23+5:30
कसबे सुकेणे : येथील कै.महंत सुकेणेकरबाबा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सुकेणेकर गादीच्या महंत पदाची जबाबदारी मनोहरशास्त्री सुकेणेकर यांच्याकडे आली
कसबे सुकेणे : येथील कै.महंत सुकेणेकरबाबा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सुकेणेकर गादीच्या महंत पदाची जबाबदारी मनोहरशास्त्री सुकेणेकर यांच्याकडे आली असून बुधवारी रात्री उशीरापर्यंत राज्यभरातील महानुभाव पंथीय संत, महंतांच्या उपस्थितीत मौजे सुकेणे येथील दत्त मंदिरात हा महंती प्रतिष्ठा विधी संपन्न झाला.
महंत यक्षदेव बाबा,महंत कापुतळणीस्कर , महंत बीडकर ,आचार्य सुभद्राबाई कपाटे, महंत नागराजबाबा ,महंत भिष्माचायॅ बाबा ,महंत साळकर बाबा , आचार्य मोठेबाबा,भाऊ गादीचे पातुरकर बाबा,महंत पाचरूटकर , महंत भीष्माचार्य ,भहंत अंकुळनेरकर हे प्रमुख महंत यावेळी उपस्थित होते.
यावेळी मंदिराच्या सभामंडपात या महंती प्रतिष्ठा विधीसाठी विशेष आसनाची व्यवस्था करण्यात आली. प्रारंभी कुलवंदना करून प्रास्ताविक आचार्य नीलेश बीडकर यांनी केले. अर्जुनराज सुकेणेकर, बाळकृष्णराज सुकेणेकर, राजधरराज सुकेणेकर, भीमराज सुकेणेकर, भास्करराज सुकेणेकर, तपस्वीनी सुवर्णाताई सुकेणेकर यांनी पुजन करून मान्यता वस्त्र प्रदान केले. तर भाऊ गादीच्या वतीने महंत बीडकर, महंत पाचरटकर व पातुरकर बाबा यांनी त्यांच्या शिष्य गाद्याच्या वतीने मान्यता वस्त्र प्रदान केले. तर अळजपुरकर महंत सुकेणेकर गादीचे शिष्य म्हणून तपस्वीनी सुभद्राबाई सुकेणेकर यांना प्रदान करण्यात आली. यावेळी मौजे व कसबे सुकेणे व जिल्हातील संत व हजारो भाविक उपस्थित होते. (वार्ताहर )