छगन भुजबळ यांना मनोज जरांगे पाटील नाशकातील सभेत प्रत्युत्तर देणार

By संजय पाठक | Published: November 17, 2023 07:22 PM2023-11-17T19:22:34+5:302023-11-17T19:23:02+5:30

सकल मराठा समाजाच्या वतीने आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची माहिती देण्यात आली.

Manoj Jarange Patil will reply to Chhagan Bhujbal in a meeting in Nashik |  छगन भुजबळ यांना मनोज जरांगे पाटील नाशकातील सभेत प्रत्युत्तर देणार

 छगन भुजबळ यांना मनोज जरांगे पाटील नाशकातील सभेत प्रत्युत्तर देणार

नाशिक - राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी आज जालना येथील सभेत मराठा आणि ओबीसी आरक्षणावर घणघाती भाष्य केल्यानंतर आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची सभा नाशिक मध्ये पुढील आठवड्यात होणार आहे दिनांक 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी नाशिक दौऱ्यात त्यांच्या दोन सभा होणार असून यावेळी ते छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर देणार आहेत.

सकल मराठा समाजाच्या वतीने आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची माहिती देण्यात आली. येत्या 21 नोव्हेंबरला जरांगे पाटील हे पालघर येथून त्रंबकेश्वरला येणार असून रात्री ते तेथेच मुक्कामी थांबतील. दि. 22 नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे त्यांची सभा होणार आहे त्यासाठी 101 एकर क्षेत्रावर सभास्थळ तयार करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे त्यांची सभा होणार आहे. जरांगे पाटील यांच्या या सभेची जय्यत तयारी सुरू असून त्यांच्या दौऱ्यात ते भुजबळ यांना आक्रमकपणे उत्तर देतील असे संयोजकांनी सांगितले. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळण्यासाठी हा लढा असून हा लढा ओबीसींच्या विरोधात नाही असेही या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं. या पत्रकार परिषदेला मराठा आंदोलकांचेच नेते नाना बच्छाव मोळी, ऍड. नितीन ठाकरे, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुनील बागुल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित 

Web Title: Manoj Jarange Patil will reply to Chhagan Bhujbal in a meeting in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.