मनोज सोल्जर्स, सोनाली हंटर्स यांचे संघ ठरले विजेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:16 AM2021-02-16T04:16:25+5:302021-02-16T04:16:25+5:30
मुलांचा अंतिम सामना चेतानंद स्ट्राईकर्स व मनोज सोल्जर्स यांच्यात झाला. सलग तीन विजयाने अंतिम फेरीत पोहोचलेल्या चेतानंद स्ट्राईकर्सची विजयी ...
मुलांचा अंतिम सामना चेतानंद स्ट्राईकर्स व मनोज सोल्जर्स यांच्यात झाला. सलग तीन विजयाने अंतिम फेरीत पोहोचलेल्या चेतानंद स्ट्राईकर्सची विजयी परंपरा मनोज सोल्जर्स या संघाने मोडली. दोन्ही संघ सामन्याच्या पूर्वार्धात १० -१० अशा सामान गुणसंख्येवर होते. मात्र, मनोज सोल्सर्जने हा सामना १७ विरुद्ध १४ अशा तीन गुणांनी जिंकून दुसऱ्या प्रीमियर लीग खो-खो स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. तर मुलींच्या गटात अजिंक्यपद सोनाली हंटर या संघाने पटकावले. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना बरोबरीत सुटला होता आणि या स्पर्धेतील शेवटचा अंतिम सामना हासुद्धा आलाहीदा डावात सोनाली हंटर्स संघाने जिंकला. विलक्षण चुरशीने खेळला गेलेला सामना १०-१० अशा समान गुणसंख्येवर थांबला होता. सोनाली हंटर्सकडून खेळताना कर्णधार सोनाली पवार हिने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत अलाहिदा डावात आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवले. या सामन्यात सोनाली पवार हिने पहिल्या डावात एक मिनीट ५५ सेकंद ,दुसऱ्या डावात तीन मिनिटे ५५ सेकंद, तर अलाहिदा डावात तीन मिनिटे पंधरा सेकंदाचे संरक्षण करताना आपल्या धारदार आक्रमणाने प्रतिस्पर्धी संघाचे सात गुण टिपले. तिला दीदी ठाकरे एक मिनिट ५५ सेकंद, दोन मिनिट दहा सेकंद व दोन गडी, विद्या मिरके प्रत्येकी एक मिनिट दहा सेकंद व एक मिनिट १० सेकंदांचे संरक्षण केले. यशोदा देशमुख व ताई पवारने प्रत्येकी दोन गडी टिपून आपल्या संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. सोनाली हंटर्स या संघाने हा सामना १५ विरूद्ध १२ अशा तीन गुणांनी जिंकून या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. विजयी संघाला पाच हजार रुपये, आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार रेणुका चैन याने पुरस्कृत केला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पश्चिम विभाग सभापती वैशाली भोसले, छत्रपती पुरस्कार विजेते अविनाश खैरनार व कार्याध्यक्ष आनंद गारमपल्ली यांच्या हस्ते करण्यात आला .
फोटो
१५खो खो फोटो
खो -खो प्रिमीअर लीगमधील विजेत्या मुलांच्या मनोज सोल्जर्स संघाचे खेळाडू. समवेत अविनाश खैरनार, वेशाली भोसले आणि आनंद गारमपल्ली.