कोरेगाव प्रकरणातील हल्लेखोर मोकाट मनोज संसारे : मनमाड येथे जनआक्रोश महासभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:23 PM2018-02-13T23:23:01+5:302018-02-13T23:52:08+5:30
मनमाड : कोरेगाव भीमा प्रकरणातील हल्लेखोर मोकाट असून, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते मनोज संसारे यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली.
मनमाड : कोरेगाव भीमा प्रकरणातील हल्लेखोर मोकाट असून, निषेध करणारे मात्र कारागृहात असल्याने या सरकारला आंबेडकरी जनता जाब विचारणार असल्याचे सांगत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते मनोज संसारे यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली. मनमाड शहर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिक तसेच संविधान परिवार सामाजिक ऐक्य मंचतर्फे आयोजित जनआक्रोश महासभेत
ते बोलत होते. लॉँग मार्च प्रणेते आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांचेही या सभेत घणाघाती भाषण झाले. कार्यक्र माचे अध्यक्ष विनय गरु ड यांनी मान्यवरांचे स्वागत केले. बाळासाहेब जगताप यांनी प्रास्ताविकातून कार्यक्र माचा हेतू विशद केला. यावेळी संसारे म्हणाले की, सरकार विरोधात विधानसभेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून, त्याच्या प्रचारार्थ आज मनमाड येथे पहिल्या सभेचा शुभारंभ करण्यात येत आहे. कोरेगाव भीमा येथे भीमसैनिकांवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला दहशत माजविण्यासाठी शासनपुरस्कृत असल्याचा आरोप त्यांनी केला. हा आंबेडकरी जनतेला भयभीत करण्याचा प्रकार असून, देशभरात अहिष्णुतेचे वातावरण निर्माण केले जात असल्याचे ते म्हणाले. प्रा. कवाडे यांनी सरकारविरोधात कडाडून टीका केली. भिडे एकबोटेंना अटक करण्याऐवजी सामाजिक न्यायाची घोषणा करणारे सरकार त्यांची पाठराखण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी अर्जुन डांगळे, गणेश उन्हवणे, विवेक चव्हाण, शहराध्यक्ष संजय भालेराव, विनय गरुड, बाळासाहेब जगताप, अरुण धिवर, राजू गायकवाड, देवेंद्र आडसुळे, प्रकाश चिवरया, जगदीश आढाव, गंगाराम इंदिसे, सुनील कदम, भागवत मोरे, तौफीक खान, विजय पगारे, तुषार आहिरे, मुकेश थोरात यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
भरतीला विलंब नाशिक : वारंवार मागणी करूनही नाशिक महापालिका प्रशासनाकडून सफाई कामगारांच्या नोकरभरतीला टाळाटाळ करण्यात येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत असून, यासंबंधी मेहेतर व वाल्मीकी समाजाच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.