मानोरीत आरोग्य तपासणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 09:13 PM2021-04-29T21:13:43+5:302021-04-30T00:41:58+5:30
मानोरी : राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. गाव, वाड्या, वस्त्या, तांडे आदी ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी होणार आहे.
Next
ठळक मुद्देप्रत्येक कुटुंबाला भेट देण्यासाठी आरोग्य पथके
मानोरी : राज्य शासनाच्या ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण या मोहिमेंतर्गत येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. गाव, वाड्या, वस्त्या, तांडे आदी ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी होणार आहे.
या मोहिमेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला भेट देण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात येणार आहे. आरोग्य तपासणी करताना कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे तापमान, ऑक्सिजन घेण्यात येणार असून याची नोंद आरोग्य पथक ठेवणार येणार आहे.