मानोरी रस्त्यावरील काटेरी झुडपे काढली स्वखर्चाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 10:10 PM2020-12-22T22:10:29+5:302020-12-23T00:54:40+5:30
मानोरी : मानोरी बुद्रुक शिव ते मानोरी या एक ते दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील अपघातास कारणीभूत ठरणारे काटेरी झुडपाच्या फांद्यांचे अतिक्रमण येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील शेळके यांनी मंगळवारी (दि.२२) स्वखर्चाने जेसीबीच्या साहाय्याने काढल्याने पादचारी व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

चार वर्षांपासून शेळके यांनी मुखेड शिव, मानोरी ते देशमाने शिव हा दोन किलोमीटर अंतराचा रस्ता, दीड किलोमीटर अंतराचा मानोरी रस्ता, गोई नदीलगत असलेल्या मानोरी ते मानोरी फाटा हा एक किलोमीटर अंतराचा रस्ता काटेरी झुडपांपासून मुक्त केला आहे. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर असलेले पडके घर पाडून स्वखर्चाने विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण तयार करून दिले आहे. या सामाजिक कार्याबद्दल रामदास सानप, गोरख शेळके, वैभव वावधाने, शेखर वावधाने, अजिंक्य वावधाने यांनी शेळके यांचे आभार मानले आहेत.