ग्रामसभेकडे मानोरी ग्रामस्थांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:11 PM2018-08-21T23:11:52+5:302018-08-22T00:25:08+5:30

येथील हनुमान मंदिरात मंगळवारी (दि.२१) ग्रामसभा  पार पडली. ग्रामसभेला मात्र ग्रामस्थांनी पाठ फिरविल्याचे  दिसून आले. दरम्यान, ग्रामपंचायतीने केलेल्या विविध प्रकारच्या  कामांची माहिती ग्रामसेवक बाळासाहेब कुशारे यांनी यावेळी दिली. 

 Manori villages have started to move towards Gramsabha | ग्रामसभेकडे मानोरी ग्रामस्थांनी फिरविली पाठ

ग्रामसभेकडे मानोरी ग्रामस्थांनी फिरविली पाठ

Next

मानोरी : येथील हनुमान मंदिरात मंगळवारी (दि.२१) ग्रामसभा  पार पडली. ग्रामसभेला मात्र ग्रामस्थांनी पाठ फिरविल्याचे  दिसून आले. दरम्यान, ग्रामपंचायतीने केलेल्या विविध प्रकारच्या  कामांची माहिती ग्रामसेवक बाळासाहेब कुशारे यांनी यावेळी दिली.  ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाचा निधी कोणत्या कामासाठी आणि किती खर्च  केला, शौचालय बांधण्यापासून किती नागरिक शिल्लक असून, शौचालय अनुदान मिळालेल्या नागरिकांची माहिती बाबासाहेब तिपायले यांनी ग्रामसभेत मांडण्यास सांगितले.  यावेळी ग्रामसेवक बाळासाहेब कुशारे, ग्रामपंचायतीचे सदस्य पोपट शेळके, गरु ड गाडेकर, सेवा संस्थेचे अध्यक्ष नंदाराम शेळके, बाबासाहेब तिपायले, बद्रिनाथ शेळके, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुनील शेळके, मधुकर शेळके, विठ्ठल वावधाने, मुख्याध्यापक अगरचंद शिंदे, पंढरीनाथ शेळजे, राजू शेळके, शांताराम शेळके, दत्तात्रेय शेळके, साहेबराव शेळके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.  पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांत साचणाऱ्या पाण्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी ग्रामपंचायतीने मुरूम टाकावा, अशीही सूचना करण्यात आली. शौचालय अनुदानाचा ज्या लाभार्थींनी लाभ घेतला. मात्र उघड्यावर शौचास जाणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. घरपट्टी, पाणीपट्टी वेळेत भरण्याचे आवाहन ग्रामसेवकांनी केले.

Web Title:  Manori villages have started to move towards Gramsabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.