कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकांचा मनपातर्फे गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:13 AM2021-05-15T04:13:52+5:302021-05-15T04:13:52+5:30
नाशिक : कोरोना संसर्गाच्या महासंकटात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व परिचारिकांचा गौरव करण्याचे निमित्त ...
नाशिक : कोरोना संसर्गाच्या महासंकटात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व परिचारिकांचा गौरव करण्याचे निमित्त परिचारिका दिनानिमित्त साधण्यात आले आणि महापालिकेच्या वतीने आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
मनपाच्या बिटको रुग्णालयातील व डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील परिचारिकांचा सत्कार आयुक्त कैलास जाधव यांनी करून त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी बिटको रुग्णालयातील मेट्रन आशा मुठाळ, सुनीता पगारे, गंगा भोये, शीला मावची व डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील मेट्रन संध्या सावंत, कविता गाडे, छाया शिंदे, नीता धात्रक, सुनीता शिंदे, सुनीता नानाजकर, पगारे, कल्पना सनान्से, उज्ज्वला पाटील, सुरेखा हिवाळे, शीतल उपासनी, माई भोसले, भाग्यश्री सहारे, नरेंद्र गवळी, दीप्ती वाजे, विजय गायकवाड, कीर्ती पावरा, उज्ज्वला पाटील आदींचा सत्कार करण्यात आला.
यानंतर आयुक्त जाधव यांनी बिटको रुग्णालय येथे गॅसच्या टाकीचा प्रोटेक्शन गीअर, तसेच परिसरात नव्याने ३ के.एल. टाकी बसविण्याच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली व येथील सीटी स्कॅन मशीनच्या कामकाजाचा आढावा घेतला. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे परिसरात ३ के.एल. नवीन टाकी बसविण्यात येणार असून, त्याच्या बेस तयार करण्याचे काम सुरू असून, त्या कामकाजाची पाहणी करून तेथील कामाचा आढावा घेतला व विविध कामांच्या सूचना, तसेच दोन्ही रुग्णालयांत सुरू असलेल्या कामाला गती देण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी केल्या. यावेळी आयुक्त कैलास जाधव यांच्यासमवेत शहर अभियंता संजय घुगे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, विभागीय अधिकारी संजय गोसावी, स्वप्नील मुदलवाडकर, कोरोना कक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड, डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. नितीन रावते, उपअभियंता राजपूत पाटोळे आदी उपस्थित होते.
छायाचित्र एनएसके एडिटवर एनएमसी कैलास जाधव सत्कार करताना.