इंडियन टूल्स कंपनीत मनसे युनियनचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:39 AM2018-05-20T00:39:12+5:302018-05-20T00:39:12+5:30
येथील इंडियन टूल्स कंपनीतील कंत्राटी कामगारांनी मनसे युनियनचा झेंडा लावताच कंपनी व्यवस्थापनाने नमते घेत युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली. मुंबईच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन कंत्राटी कामगारांना देण्यात आले आहे.
सातपूर : येथील इंडियन टूल्स कंपनीतील कंत्राटी कामगारांनी मनसे युनियनचा झेंडा लावताच कंपनी व्यवस्थापनाने नमते घेत युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली. मुंबईच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन कंत्राटी कामगारांना देण्यात आले आहे. इंडियन टूल्स कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणाºया सुमारे सव्वा दोनशे कामगारांनी वेतनवाढीच्या कराराचा आर्थिक लाभ मिळावा, नियमाप्रमाणे किमान वेतन मिळावे, नियमाप्रमाणे ओव्हर टाइमचा लाभ मिळावा, व्यवस्थापनाने कमी केलेल्या सहा कामगारांना कामावर घेण्यात यावे, १० ते १२ वर्षांपासून ठेकेदारीवर काम करणाºया कामगारांना कायम करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी २२० कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या कामगारांनी शुक्र वारी मनसेची युनियन स्थापन करून प्रवेशद्वारावर मनसे युनियनच्या फलकाचे अनावरण केले. यावेळी युनियनचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, चिटणीस अंकुश पवार, कैलास मोरे, विजय अहिरे, मनोज बोराडे, राहुल ढिकले उपस्थित होते. कंत्राटी कामगारांनी मनसेचा झेंडा लावताच कंपनी व्यवस्थापनाने युनियनच्या पदाधिकाºयांना चर्चेसाठी पाचारण केले. कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनाबाबत सोमवारी मुंबईत जाऊन वरिष्ठ व्यवस्थापनाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन एचआर विभागाचे उपाध्यक्ष मेजर रमेश शिराढोणकर यांनी दिल्याचे कामगारांनी सांगितले.