मनसापुरी महाराज पायी दिंडीचा तपपूर्ती सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 02:19 PM2018-03-12T14:19:44+5:302018-03-12T14:19:44+5:30
नांदूरशिंगोटे - भारत देशाला संत-महंताची व राष्ट्र पुरूषांची मोठी परंपरा असून वारकरी संप्रदाय हा जगात सर्वश्रेष्ठ संप्रदाय आहे. संत पुरु षांनी जाती भेदाला मूठमाती देवून सर्व समाजाला एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडविले असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यास प्रा.तुळशीराम महाराज गुट्टे यांनी केले. येथील मनसापुरी महाराज पाया दिंडी सोहळ्याच्या तपपूर्तीनिमित्त ते बोलत होते.
नांदूरशिंगोटे - भारत देशाला संत-महंताची व राष्ट्र पुरूषांची मोठी परंपरा असून वारकरी संप्रदाय हा जगात सर्वश्रेष्ठ संप्रदाय आहे. संत पुरु षांनी जाती भेदाला मूठमाती देवून सर्व समाजाला एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडविले असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यास प्रा.तुळशीराम महाराज गुट्टे यांनी केले. येथील मनसापुरी महाराज पाया दिंडी सोहळ्याच्या तपपूर्तीनिमित्त ते बोलत होते. सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील मनसापुरी महाराज दिंडी सोहळा त्र्यंबकेश्वर व आंंळदी येथे गेल्या बारा वर्षांपासून पायी चालत जात आहे. त्यानिमित्ताने तपपूर्ती व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रेणुकामाता मंदिराच्या प्रांगणात कार्यक्र ामाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस झालेल्या कार्यक्र मात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले. व्यासपीठावर स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, अंनत विभूषित स्वामी सोमेश्वरानंद स्वरस्वती, हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघ संस्थापक अध्यक्ष महंत पंडीत, आमदार राजाभाऊ वाजे,माजी पंचायत समिती सदस्य उदय सांगळे,जिल्हा परिषद सदस्य निलेश केदार, पंचायत समिती सदस्य शोभा दिपक बर्के उपस्थित होते. रविवारी सकाळी ९ वाजता गावातून ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली.आकर्षक सजाविलेल्या रथातून मनसापूरी महाराज यांच्या पादुका तसेच संत व महंत यांची टाळ- मृंदग आणि ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. गावात ठिक ठिकाणी रथाचे व पादुकांचे पूजन करून औक्षण करण्यात आले. मिरवणुकीत येथील व्ही.पी.नाईक हायस्कूलचे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी सहभागी घेवून पर्यावरणचा संदेश दिला. बाल वारकरी, भजनी मंडळ, महिला, तरु ण, अबालवृध्द व भाविक हातात भगव्या पताका घेवून सहभागी झाले होते. कार्यक्र माच्या सुरु वातीला उपस्थित मान्यवरांचा समतिीच्या वतीने तुलशीवृदांवन देवून सत्कार करण्यात आला. महंतांच्या हस्ते त्यांना तुळशीवृंदावन व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.