नाशिकच्या मंजू राठी यांना ‘वुमन इनोव्हेटर’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:33 AM2018-05-09T00:33:43+5:302018-05-09T00:33:43+5:30
नाशिक : वुमन इनोव्हेटर, अमेरिका दूतावास आणि सीओडब्ल्यूई (कॉमन चेंजमेकर वुमन इंटरप्रिनर) यांच्या वतीने आयोजित ‘१०० वुमन फेसेस आॅफ इंडिया’ स्पर्धेत नाशिकच्या मंजू राठी-बेळे यांना ‘वुमन इनोव्हेटर’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
नाशिक : वुमन इनोव्हेटर, अमेरिका दूतावास आणि सीओडब्ल्यूई (कॉमन चेंजमेकर वुमन इंटरप्रिनर) यांच्या वतीने आयोजित ‘१०० वुमन फेसेस आॅफ इंडिया’ स्पर्धेत नाशिकच्या मंजू राठी-बेळे यांना ‘वुमन इनोव्हेटर’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या ‘ईशाश्री’ ग्रुपचे मूल्यशिक्षण क्षेत्रातील काम बघून त्यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतातील विविध क्षेर्त्रंत काम करणाऱ्या महिलांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. या प्रस्तावांमधून समाजासाठी प्रेरणादायी काम करणाºया महिलांची निवड करण्यात आली. एप्रिलअखेर दिल्लीच्या एका हॉटेलामध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी भारतभरातील प्रेरणादायी काम करणाºया, समाजाला सकारात्मक ऊर्जा देणाºया उद्योजक, लघुद्योजक, बॅँक, गुंतवणूक सल्लागार, सामाजिक कार्यकर्त्या असणाºया १०० महिलांचा सन्मान करण्यात आला. यासाठी परीक्षक म्हणून नैना लाल किडवाई, अविजीत दत्त, ब्लॉसम कोचर, सोनम वांगचुक, अर्चना गुप्ता, गौरी सरिन, रिता गंगवानी, मीता सेनगुप्ता यांनी काम पाहिले होते.