जिल्ह्यात तब्बल ५७५ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 02:27 AM2020-07-24T02:27:58+5:302020-07-24T02:31:22+5:30

जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत गुरु वारी तब्बल ५७५ नागरिकांची भर पडली तसेच नाशिक महानगरातील नऊ आणि ग्रामीणच्या चौघांचा मृत्यू झाल्याने १३ बळींची वाढ झाल्याने एकूण संख्या ४३३ वर पोहोचली आहे.

As many as 575 affected in the district | जिल्ह्यात तब्बल ५७५ बाधित

जिल्ह्यात तब्बल ५७५ बाधित

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत ७७९८ रु ग्ण पूर्णपणे बरे होऊन परतले घरी

नाशिक : जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत गुरु वारी तब्बल ५७५ नागरिकांची भर पडली तसेच नाशिक महानगरातील नऊ आणि ग्रामीणच्या चौघांचा मृत्यू झाल्याने १३ बळींची वाढ झाल्याने एकूण संख्या ४३३ वर पोहोचली आहे.
नाशिक महानगरांमध्ये कोरोनाने थैमान घातलेले असून गुरु वारी तब्बल ४३७ नवीन रु ग्णांची भर पडली आहे तर नाशिक ग्रामीण मध्ये १३० आणि मालेगावमध्ये ते आठ नवीन रु ग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील आतापर्यंतची बाधित रु ग्ण संख्या १० हजार ९६९वर पोहोचली आहे अर्थात त्यातील ७७९८ रु ग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांच्या घरी परतले आहेत त्यामुळे सद्य स्थितीत जिल्ह्यात २७३८ इतकेच रु ग्ण उपचार घेत आहेत.
तब्बल १३०० नवीन संशयित
िजल्ह्यात गुरु वारी पुन्हा एकदा दाखल रु ग्णांचा आकडा एक हजारांवर पोहोचला आहे. गुरु वारी नव्याने दाखल झालेल्या १३०० रु ग्णामागे तब्बल ७४२ संशयित हे नाशिक महापालिका हद्दीतील विविध रु ग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. नाशिक ग्रामीणचे ३५२, जिल्हा
रुग्णालयातील १२, डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयात १३, मालेगाव मनपा रुग्णालयांत १६ आणि गृह विलगीकरण कक्षात १५५ संशयित रु ग्णांना ठेवण्यात
आले आहे. नवीन दाखल रु ग्ण आणि
प्रलंबित अहवालांची संख्या पाहता येत्या दोन दिवसात अधिक मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: As many as 575 affected in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.