मेरी परिसरात अनेकांना घडले बिबट्याचे दर्शन?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:02 AM2017-08-21T00:02:59+5:302017-08-21T00:18:29+5:30
दिंडोरीरोडवरील सीडीओ मेरी कार्यालयामागे असलेल्या पेठरोड बाजार समितीकडे जाणाºया लिंकरोडवर रविवारी सायंकाळी बिबट्याने दर्शन दिले. या परिसरात बिबट्या दिसल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़
पंचवटी : दिंडोरीरोडवरील सीडीओ मेरी कार्यालयामागे असलेल्या पेठरोड बाजार समितीकडे जाणाºया लिंकरोडवर रविवारी सायंकाळी बिबट्याने दर्शन दिले. या परिसरात बिबट्या दिसल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़ तारवालानगर चौफुलीकडून पेठरोडला जोडल्या जाणाºया लिंकरोडवर एका चारचाकी वाहनचालकास रस्त्यात बिबट्या दिसला़ त्याने लिंकरोडवर वाहन तपासणी करणाºया वाहतूक पोलिसांना याबाबत माहिती दिली़ तसेच या बिबट्याबाबत काही नागरिकांनी पोलिसांना कळविल्याने पोलीस पथक परिसरात दाखलही झाले मात्र त्यांना बिबट्याचे दर्शन झाले नाही. पोलीस प्रशासनाने सुरक्षितता म्हणून परिसरातील मंदिर परिसरात खेळणारी लहान मुले, तसेच ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पोलिसांनी केलेल्या पाहणीत बिबट्या न दिसल्याने खरोखरच बिबट्या आला होता की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बिबट्याचा वावर असल्याची वार्ता परिसरात पसरल्याने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे़ त्यातच सिडीओ मेरी परिसरात दाट वृक्ष व मेरीचा जंगलमय भाग असल्याने कदाचित भक्षाच्या शोधात बिबट्या आला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.