शहरातील अनेक एटीएम बंद

By admin | Published: November 15, 2016 02:36 AM2016-11-15T02:36:02+5:302016-11-15T02:46:45+5:30

चलन पुरवठ्यावर परिणाम : सुट्या पैशांचा प्रश्न कायम

Many ATM closures in the city | शहरातील अनेक एटीएम बंद

शहरातील अनेक एटीएम बंद

Next

नाशिक : केंद्र सरकारच्या निर्णयामुळे बाजारात निर्माण झालेला सुट्या चलनी नोटांचा तुटवडा कायम असून, सोमवारी बँका बंद असल्याने यात आणखी भर पडली आहे. त्यातच सोमवारी शहरातील बहुतांश एटीएम बंद असून, सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयिकृत बँकांचे काही एटीएम सुरू आहेत. मात्र या एटीएममध्येही बँकांकडून भरणा झाल्यानंतर काही तासांच्या आत पैसे संपत असल्याने बाजारात गरजेप्रमाणे चलन पुरवठा होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
नागरिकांनी बँकांमध्ये उभे राहून नोटा बदलून घेण्यापेक्षा आपल्या खात्यावर सीडीएमद्वारे पैशाचा भरणा केला. परंतु त्याबदल्यात एटीएम अथवा बँकेत रांगेत उभे राहूनही केवळ नंबर आला नाही म्हणून अनेकांना सुटे पैसे अथवा नवीन नोटा मिळाल्या नाहीत. त्यांचे पैसे बँकांमध्ये अडकले असून सोमवारी शहरातील बहुतेक एटीएम व बँका बंद असल्याने अशा नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
दैनंदिन व्यवहारात ग्राहकांकडून व्यापारी, पेट्रोलपंप, दुकानदारांकडे येणाऱ्या १०, २०, ५० व १०० च्या नोटा पुन्हा बाजारात येत नसल्याने सुट्या नोटांचा एकतर्फी प्रवाह सुरू आहे. त्यातच ग्राहकांनी बँकांमधून बदलून घेतलेले दोन हजार रुपयांचेही सुटे मिळेनासे झाल्याने हाती नवे चलन येऊनही फायदा होत नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Many ATM closures in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.