छाननीत अनेक उमेदवारांचे अर्ज बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 12:53 AM2021-01-01T00:53:36+5:302021-01-01T00:54:00+5:30

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या  निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यामध्ये अनेकांचे अर्ज बाद झाल्याने त्यावरील हरकती आणि हस्तक्षेप यामुळे अर्ज छाननीची प्रक्रिया चांगलीच  लांबली. शौचालय वापर प्रमाणपत्र आणि सातवीची शैक्षणिक अर्हता यामुळे अनेकाचे अर्ज बाद झाले.

Many candidates' applications were rejected in the scrutiny | छाननीत अनेक उमेदवारांचे अर्ज बाद

छाननीत अनेक उमेदवारांचे अर्ज बाद

Next
ठळक मुद्देहालचाली गतिमान : माघारी होणार ४पर्यंत

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या  निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यामध्ये अनेकांचे अर्ज बाद झाल्याने त्यावरील हरकती आणि हस्तक्षेप यामुळे अर्ज छाननीची प्रक्रिया चांगलीच लांबली. शौचालय वापर प्रमाणपत्र आणि सातवीची शैक्षणिक अर्हता यामुळे अनेकाचे अर्ज बाद झाले.
दरम्यान, येत्या ४ जानेवारी रोजी अर्ज माघारीचा दिवस असल्याने या मधल्या काळात अनेक राजकीय हालचाली होणार आहेत.      ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज छाननीत  नाशिक तालुक्यात २९ तर बागलाण तालुक्यात ३० उमेदवारांचे अर्ज बाद झाले. इतर तालुक्यात रात्री उशिरापर्यंत छाननीचे काम सुरु होते. परंतु अनेक तालुक्यांमध्ये छाननी दरम्यान उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचे आक्षेपामुळे काही ठिकाणी विलंब झाला. सायंकाळपर्यंत   येवला १३, दिंडोरी १७,  बागलाण  ३०, नाशिक २९ व देवळ्यात एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. सिन्नर, कळवण, निफाड,  चांदवड, मालेगाव, नांदगाव या तालुक्यातील अर्ज छाननीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. येत्या चार जानेवारीला अर्ज माघारी मुदत 
असून चिन्ह वाटप होणार आहे.
प्रकिया अद्याप अपूर्ण
रात्री आठ वाजेपर्यंत दिंडोरी, बागलाण, देवळा आणि नाशिक तालुक्यातीलच अर्ज छाननीची प्रकिया पूर्ण होऊ शकली.  जिल्ह्यात १३ तालुक्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी  १६ हजार ९९३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.  या अर्जांची छाननी प्रक्रिया गुरूवारी राबविण्यात आली.

Web Title: Many candidates' applications were rejected in the scrutiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.