पोटासाठी अनेकांनी बदलला पारंपरिक व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 08:58 PM2020-07-20T20:58:37+5:302020-07-21T01:54:35+5:30
येवला : कोरोनाने बाजारपेठेसह अनेक छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायांवर विपरीत परिणाम केला. परिणामी बेरोजगारी वाट्याला आलेल्या अनेकांनी पोटासाठी आपले पांरपरिक व्यवसाय सोडून देत दोन पैसे देणारे इतर व्यवसाय सुरू केले आहेत.
येवला : (योगेंद्र वाघ) कोरोनाने बाजारपेठेसह अनेक छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायांवर विपरीत परिणाम केला. परिणामी बेरोजगारी वाट्याला आलेल्या अनेकांनी पोटासाठी आपले पांरपरिक व्यवसाय सोडून देत दोन पैसे देणारे इतर व्यवसाय सुरू केले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी सुरू झाली, त्यापाठोपाठ जिल्हाबंदी, गावबंदी. लॉकडाऊनमुळे जनजीवनच ठप्प झाले. बाजारपेठा ठप्प झाल्या, उद्योग-व्यवसाय बंद पडले. सर्वच जण घरात अडकडून पडले. अनेकजण बेरोजगार झाले. तीन महिन्यात स्वत:जवळील जमापुंजीही संपल्यानंतर अनेकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला. त्यामुळे अनेकांनी पोटासाठी आपले पारंपरिक व्यवसाय सोडून दोन पैसे मिळवून देणारे लॉकडाऊन, संचारबंदी काळात चालणारे व्यवसाय सुरू केल्याचे चित्र येवला तालुक्यात दिसून येत आहे.
येवल्यात फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या अजय शेख या तरुणाने फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला. अजय बारा ते तेरा वर्षांपासून तालुक्यात फोटोग्राफीचा व्यवसाय करतो. लग्नसराईत चार-पाच महिने फोटोग्राफी करायची व त्यातून मिळणाºया उत्पन्नातून वर्षभर घरप्रपंच चालायचा; परंतु कोरोनामुळे लग्नसराई सुरू होण्याआधीच फोटोग्राफी व्यवसाय लॉक
झाला.
वर्षभराच्या उत्पन्नावर पाणी फिरले. यामुळे कुटुंब चालवायचे कसे, प्रपंच सांभाळायचा कसा असा प्रश्न उपस्थित झाला. म्हणून अजयने रस्त्यावर फळ विक्र ी सुरू केली. अजयसारखेच काही फोटोग्राफर व्यवसायिकांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. योगेश भावसार हा तरुण बस स्टॅण्डवर पेपर विक्र ी करायचा. लॉकडाऊनमुळे बससेवा बंद झाली त्यामुळे प्रवासीही नाही.
परिणामी योगेशने शहरात सायकलवर मटकी विक्र ीचा व्यवसाय सुरू केला.काही सायकलवर खारी-टोस्ट विकतात, तर काही शेंगदाणे-गुडदाणी विकत आहेत.
पैठणी विणकर कारागीर वाल्मीक सासे यांच्या घरात दोन हातमाग आहेत. पैठणी उत्पादनातून ते आपले कुटुंब चालवतात. परंतु कोरोनाने ऐन लग्नसराईत बाजारपेठा ठप्प झाल्या. परिणामी व्यवसाय बंद पडला. कुटुंब चालवण्यासाठी त्यााने भाजीपाला विक्र ी व्यवसाय सुरू केला.
--------------------
शेतमालास दर नसल्याने शेतकरी हैराण
कोरोना संसर्गाने शेती व्यवसायही प्रभावित झाला आहे. लॉकडाऊनमुळे बाजार समित्या बंद असल्याने शेतीमाल कवडीमोल किमतीत विकावा लागला तर अनेकांना फेकून द्यावा लागला. आधीच अडचणीत असलेला शेतकरी कोरोनाने आणखीनच अडचणीच्या खाईत लोटला गेला आहे.
------------
कर्ज फेडण्याचे आव्हान
अनेक व्यवसायिकांनी बँका, पतसंस्था, खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन व्यवसाय उभे केले आहेत. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने कर्जाचे हफ्ते फेडायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या भीतीने ग्राहक दुकानापर्यंत येत नसल्याने व्यवसाय सुरू करूनही पैसे मिळतील याची शाश्वती नसल्याने व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कायम आहे.